MG Comet EV: ज्या मॉडेलची सर्वांनाच उत्सुकता होती. ती कार कधी लाँच होणार याची भारतीय ग्राहक वाट पाहत होते. ती अखेर भारतात लाँच झाली आहे. MG Motor India ने भारतात नवीन MG Comet EV लहान इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे, ही दोन डोअर इलेक्ट्रिक कार अनेक नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे, एवढेच नाही तर या कारच्या आतील भागात फ्लोटिंग ट्विन डिस्प्ले देखील आहे. जे त्याचा लुक अधिक आकर्षित करते. ही कार भारतीय बाजारातील कंपनीची दुसरी आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. 

MG Comet EV फीचर्स

या इलेक्ट्रिक कारमध्ये १०.२५-इंचाची स्क्रीन असेल, जी टच स्क्रीन युनिट इंफोटेनमेंट युनिट म्हणून काम करते, तर ड्रायव्हरच्या समोरची दुसरी स्क्रीन इन्स्ट्रुमेंटेशनसाठी वापरली जाते. यासोबतच या मॉडेलमध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण, पुढील आणि मागील एअरबॅग्ज देखील मिळतील. मागील पार्किंग सेन्सर्स, रिव्हर्सिंग कॅमेरा, मल्टिपल एअरबॅग्ज, पॉवर-फोल्डिंग ORVM, एलईडी हेडलाइट्स, अॅम्बियंट लाइट, कनेक्टेड कार टेक, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. याला दोन दरवाजा सोबत आणले आहे. ज्यात ४ लोक बसण्याची जागा मिळेल.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…
Top Companies, Lose, Rs 1.97 Lakh Crore , market valuation, infosys, tcs, hdfc bank, hindustan unilever, finance, financial knowledge, financial year end,
आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट

(हे ही वाचा : TaTa च्या ‘या’ इलेक्ट्रिक कारला पुण्यात लागली आग, Video होतोय व्हायरल, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, म्हटलं… )

MG Comet EV बॅटरी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी MG छोटी इलेक्ट्रिक कार १७.३kWh बॅटरी पॅक आणि मागील-एक्सल-माउंट इलेक्ट्रिक मोटरसह सुसज्ज असेल जी ४१.४bhp पॉवर आणि ११०Nm टॉर्क जनरेट करते.

MG Comet EV चार्ज

चार्जिंगसाठी, MG Comet EV ३.३kW AC चार्जर वापरते. जे फक्त ५ तासात ० टक्के ते ८० टक्के चार्ज होऊ शकते आणि त्याच चार्जरचा वापर करून EV पूर्ण चार्ज होण्यासाठी २ तास लागतात. परिमाणांच्या बाबतीत, MG EV २,९७४ मिमी लांब, १,५०५ मिमी रुंद आहे. तसेच, मॉडेलचा व्हीलबेस फक्त २,०१०mm आहे.याची ड्रायविंग सिंगल चार्जवर रेंज २०० ते २५० किमी पर्यंत असू शकते. 

MG Comet EV किंमत

वाहन निर्माता २६ मे रोजी MG Comet EV ची किंमत सांगू शकेल. त्याचवेळी, त्याची किंमत सुमारे १० लाख रुपये असू शकते.