scorecardresearch

Auto Expo 2023: एमजी मोटर इंडियाने लाँच केल्या सुरक्षित, शून्य उत्सर्जन असलेल्या दोन ईव्ही कार्स

कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधील १४ उत्पादनासाठी तयार वाहनांचे प्रदर्शन केले.

Auto Expo 2023: एमजी मोटर इंडियाने लाँच केल्या सुरक्षित, शून्य उत्सर्जन असलेल्या दोन ईव्ही कार्स
Auto Expo 2023: MG Motor India

ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये एमजी मोटर इंडियाने भविष्यातील कारचे लाँचिंग केले. एमजी मोटरचा प्रमुख उद्देश हाच आहे की, ब्रॅण्डची शाश्वत , जागरूकता आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यातून दिसून यावे.

एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव छाबा म्हणाले की, “आम्ही शाश्वत, मनुष्याधारित आणि भविष्यात्मक तंत्रज्ञानाने प्रेरित जगाच्या दिशेने काम करण्यावर विश्वास ठेवतो. आमचे ध्येय विचारपूर्वक आणि जागरूकता या दोन गोष्टी आयुष्याचा एक मार्ग असलेल्या वातावरणाच्या निर्मितीवर काम करण्याचे आहे. आमची येथे प्रदर्शित केली गेलेली ईव्ही आणि एनईव्ही श्रेणीतील उत्पादने एमजीची वचनबद्धता दर्शवतात आणि भारतात हरित व शाश्वत मोबिलिटीचा अंगीकार वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.”

कंपनीने दोन तंत्रज्ञानाने अद्ययावत, अधिक सुरक्षित आणि शून्य उत्सर्जन असलेली दोन विद्युत वाहने (ईव्ही) देखील यावेळी लाँच केली. त्यांनी या कार्यक्रमादरम्यान ऑटो तंत्रज्ञान ब्रँड म्हणून आपले विचार अधोरेखित केले. ही दोन नवीन वाहने एमजी ४, पूर्णपणे इलेक्ट्रिक हॅचबॅक ईव्ही आणि एमजी ईएचएस, प्लग इन हायब्रिड एसयूव्ही आहेत.

हेही वाचा : Auto Expo 2023: शाहरुख खानने लाँच केली Hyundai ची ‘ही’ कार, एकदा चार्ज केली की…; पाहा आकर्षक फिचर्स

एमजी४ ईव्ही हॅचबॅक भरपूर जागा असलेली इंटिरियर घेऊन येते. त्यामुळे पाच वेगवेगळ्या चार्जिंगच्या पर्यायाद्वारे ड्रायव्हिंग अत्यंत सुलभपणे होऊ शकते. २०२२ मध्ये ही गाडी बाजारात आल्यापासून एमजी४ ईव्ही हॅचबॅक ही गाडी जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इटली, स्पेन, नॉर्वे आणि स्वीडन अशा २० पेक्षा जास्त युरोपियन बाजारपेठांमध्ये विकली जाते.एमजी ईएचएस प्लग इन हायब्रिड ही गाडी भरपूर जागा असलेले इंटिरियर आणि उत्तम बाह्यरचना यांच्यासह कार्यक्षमता आणि कामगिरी या दोन्ही गोष्टी एकत्र आणते.

हेही वाचा : Auto Expo 2023: MG Motors ची जबरदस्त लूक आणि फीचर्ससोबत ‘नेस्क्ट-जनरेशन हेक्टर’ देशात सादर; पाहा काय आहे खास

“आज ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी आमच्या पोर्टफोलिओमधील या दोन अप्रतिम आणि जागतिक स्तरावर गौरव केल्या गेलेल्या गाड्या आणताना खूप आनंद होत आहे. या वाहनांचे अनावरण ग्राहक संशोधन आणि बाजारातील अभिप्राय यांच्यावर अवलंबून असेल,” ते पुढे म्हणाले.एमजीचे ऑटो तंत्रज्ञान आणि शाश्वत ब्रँड म्हणून असलेले स्थान भारतीय ऑटो उद्योगासाठी त्यांनी हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांमध्ये दिसून येते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 18:33 IST

संबंधित बातम्या