MG Motor Gloster Blackstorm Edition: काही दिवसांपाूर्वी एमजी मोटर इंडियाद्वारे एक टीझर शेअर करण्यात आला होता. या टीझरमध्ये त्यांच्या ग्लोस्टरच्या नव्या स्पेशल एडिशनची झलक दाखवण्यात आली होती. कंपनीने या स्पेशल एडिशनला Blackstorm असे नाव दिले होते. ही कार आज (२९ मे) रोजी बाजारामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. लॉन्च बाबतची घोषणा एमजी मोटरकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. ग्लोस्टरचे ब्लॅकस्टॉर्म ए़डिशन 2WD आणि 4WD कॉन्फिगरेशनसह सहा आणि सात-सीटर प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Carwale.com ने दिलेल्या माहितीनुसार,ो एमजी मोटरने या स्पेशल एडिशनमध्ये आतल्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही बाजूंनी कॉस्मेटिक बदल केले आहेत. मेटल ब्लॅक पेंट स्कीमसह रेड अ‍ॅक्सेंट ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्ये करण्यात आले आहेत. कारमध्ये पुढच्या-मागच्या बाजूचे स्किड प्लेट्स, ORVM, डोअर पॅनेल्स आणि हेडलाइट क्लस्टर्स अशा भागांवर लाल रंगाच्या सहाय्याने गार्निश करुन सजवण्यात आले आहेत. समोरच्या फेंडर्सवर ब्लॅकस्टॉर्म या शब्दाच्या बॅजिंगसह टेलगेटवर ग्लोस्टर असे काळ्या रंगात लिहिलेले दिसते. अलॉय व्हील, छतावरील रेल, स्मोक्ड टेललाइट्स, खिडकी अशा ठिकाणी डार्क ब्लॅक रंगाचा वापर करण्यात आला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

आणखी वाचा – MG च्या ‘या’ EV कारने पार केला १० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा, घरी आणि ऑफिसमध्ये कंपनी देणार…

ज्याप्रमाणे गाडीच्या बाहेर डार्क रंग आहेत, अगदी तीच रंगसंगती/कलर थीम गाडीच्या आतमध्येही पाहायला मिळते. डॅशबोर्ड, अपहोल्स्ट्री यांना काळ्या आणि लाल रंगाच्या थीमने रंगवण्यात आले आहे. स्टीअरिंग व्हील, फ्लोअर मॅट्स, डोअर पॅड गडद लाल रंगामध्ये आहे. या शानदार स्पेशल एडिशनमध्ये सामान्य ग्लोस्टरप्रमाणे BS6 Phase 2-updated 2.0-litre diesel engine आहे. शिवाय त्यात टर्बो आणि ट्विन-टर्बो असे दोन ऑप्शन उपलब्ध आहेत. दोन्ही ऑप्शन्सना 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. ट्विन-टर्बो प्रकारात 4WD कॉन्फिगरेशन देखील आहे.

MG Motor Gloster Blackstorm Edition ची किंमत –

  • Blackstorm six-seater 2WD – ४०.३० लाख
  • Blackstorm seven-seater 2WD – ४०.३० लाख
  • Blackstorm six-seater 4WD – ४३.०८ लाख
  • Blackstorm seven-seater 4WD – ४३.०८ लाख

Story img Loader