Auto Expo 2023: एमजी मोटर इंडियाने आज सोमवारी ९ जानेवारीला नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे अनावरण केले. या कारमध्ये अनेक उत्साहवर्धक नवीन तंत्रज्ञान, सर्वोत्तम वैशिष्ट्ये व आरामदायी ड्रायव्हिंग वैशिष्ट्य समाविष्ट आहे. नेक्स्ट-जनरेशन हेक्टर अधिक सर्वोत्तम सुरक्षितता व ड्रायव्हिंग सोयीसुविधेसह ऑन-रोड अनुभव वाढवण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. नवीन एसयूव्हीमध्ये नवीन आकर्षक एक्स्टीरिअर व लक्ष वेधून घेणारे इंटीरिअर्स, सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत आणि आकर्षक डिझाइन एलीमेंट्स अनपेक्षित ड्राइव्ह व युजर अनुभव देतात. ५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशनमध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स आणि एैसपैस जागा आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांनी आपल्या ग्राहकांचे आभार मानले आहे. ते म्हणाले, हेक्टरने पहिल्यांदाच इंटरनेट कारचा अनुभव दिला. ही नेक्स्ट-जनरेशन हेक्टर लुक्स, इंटीरिअर्स व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एमजी हेक्टरचा दर्जा वाढवते. ही कार आमच्या एमजी शील्ड प्रोग्रामच्या आश्वासनासह येते, जे आमच्या ग्राहकांना विनासायास व सुलभ मालकीहक्क अनुभव देते आणि ग्राहक आता भारतभरातील आमच्या ३०० केंद्रांमध्ये स्वत:हून नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचा अनुभव घेऊ शकतात.’’

kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
image and signature of Dr Babasaheb Ambedkar, pen, writing wonders of pune
घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र

(हे ही वाचा : Auto Expo 2023: देशात सादर होणार तुमच्या आवाजाने पार्क होणारी ‘Self Balancing’ इलेक्ट्रिक स्कूटर)

एमजी मोटर ‘नेस्क्ट-जनरेशन हेक्टर’ कशी आहे खास?

ऑटोनॉमस लेव्हल २ एसयूव्हीमध्ये ११ अडवान्स्ड ड्रायव्हर असि‍स्टण्स सिस्टम्स (एडीएएस) वैशिष्ट्यांसह ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) व ऑटो टर्न इंडिकेटर्स आहेत, ज्यामधून परिपूर्ण मन:शांती, सुरक्षितता व आरामदायीपणाची खात्री मिळते. इंटेलिजण्ट ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) वेईकलला लेनच्या मध्यभागी आणि पुढील बाजूस असलेल्या वेईकलपासून सुरक्षित अंतर ठेवत वाहतूक कोंडीच्या स्थितीत किमान प्रयत्न व अधिक सुरक्षिततेची खात्री देते.

नेक्स्ट जनरेशन एमजी हेक्टरमध्ये नवीन सादर करण्यात आलेले स्मार्ट ऑटो टर्न इंडिकेअर्स देखील त्रासमुक्त व सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देतात. स्टीअरिंग अँगलवर आधारित संबंधित इंडीकेटर लाइट आपोआपपणे ऑन/ऑफ होते. हे ऑटोमॅटिक सिग्नल पार्किंगमधून रस्त्यावर येताना किंवा यू-टर्न घेताना ड्रायव्हर इंडीकेटर देण्यास विसरला तर उपयुक्त ठरेल.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: यंदाच्या ऑटो एक्स्पोत काय खास असणार? जाणून घ्या तिकिटासह सर्व माहिती)

नवीन एसयूव्हीमध्ये भारतातील सर्वात मोठी ३५.५६ सेमी (१४-इंच) एचडी पोर्ट्रेट इन्फोटेन्मेंट सिस्टमसह ब्रॅण्ड-न्यू युजर इंटरफेस आहे. तंत्रज्ञान नवोन्मेष्कारी फर्स्ट-इन-सेगमेंट डिजिटल ब्ल्यूटूथ की आणि की शेअरिंग क्षमतेमध्ये समाविष्ट आहे. इमर्जन्सीमध्ये किंवा चावी हरवल्यास डिजिटल की वेईकल लॉक, अनलॉक, स्टार्ट व ड्राइव्ह करण्यासाठी वापरता येऊ शकते. रिमोट लॉक / अनलॉक वैशिष्ट्याचा वापर करत कार कुठूनही अनलॉक करता येऊ शकते. की-शेअरिंग फंक्शनसह जवळपास दोन व्यक्तींना अतिरिक्त की शेअर करता येऊ शकते.

तसेच नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये ७५ हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्यांसह १०० वॉईस कमांड्स आहेत, ज्याचे श्रेय क्रांतिकारी आय-स्मार्ट तंत्रज्ञानाला जाते, ज्यामध्ये स्मार्टर व आनंददायी ड्राइव्हसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कनेक्टीव्हीटी, सर्विसेस व अॅप्लीकेशन्स आहेत.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: 6 एअरबॅग आणि जबरदस्त मायलेज देणाऱ्या Hyundai च्या ‘या’ फेसलिफ्टचे बुकिंग सुरु; किंमत…)

एमजी मोटर ‘नेस्क्ट-जनरेशन हेक्टर’ फीचर्स

नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इतर प्रमुख सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री, एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस), हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी), ऑल फोर-व्हील डिस्क ब्रेक्स, सर्व आसनांसाठी ३-पॉइण्ट सीट बेल्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (ईपीबी)आणि फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स.

५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशन्समध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टर प्लसमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स व एैसपैस जागा आहे. इंटीरिअर्स ड्युअल-टोन अर्जाइल ब्राऊन व ब्लॅक थीमसह वूडन फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. ६-आसनी एसयूव्ही सीट्स कॅप्टन कन्फिग्युरेशनमध्ये येतात, तर ७-आसनी वेईकलमध्ये बेंच सीट्स आहेत.

नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अद्वितीय कार मालकीहक्क प्रोग्राम ‘एमजी शील्ड’ विक्री-पश्चात्त सेवा पर्यायांचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना प्रमाणित ५+५+५ पॅकेज देण्यात येईल, म्हणजेच मर्यादित किलोमीटर्ससह पाच वर्षांची वॉरंटी, पाच वर्षांचे रोडसाइड असिस्टण्स आणि पाच लेबर-फ्री पीरियोडिक सर्विसेस मिळेल.