केंद्र सरकार आणि रस्ते वाहतूक मंत्रालय रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, त्यात नवीन नियमांसह वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये बदल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्तापर्यंत केंद्र सरकार आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, एअरबॅग्ज, सेफ्टी फीचर्स आणि वाहतूक नियमांबाबत अनेक नियम लागू केले आहेत, ज्यामध्ये वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या टायर्सबाबत मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

एक मोठा निर्णय घेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या टायरच्या डिझाइनमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. मंत्रालयाद्वारे सुधारित डिझाइन टायर्स १ ऑक्टोबर २०२२ पासून तयार केले जातील आणि त्यांची विक्री १ एप्रिल २०२३ पासून सुरू होईल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टायर्सच्या डिझाइनमध्ये केलेले बदल C1, C2 आणि C3 श्रेणीतील टायर्सना लागू होतील. ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्डनुसार, मंत्रालयाच्या या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर टायर्सची रचना IAS-142:2019 नुसार केली जाईल.

आणखी वाचा : नवीन इलेक्ट्रिक कार घ्यायचीय? ‘या’ राज्यात १० लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल

टायर्सच्या डिझाईनबाबत मंत्रालयाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय जाणून घेतल्यानंतर, टायर्समध्ये C1, C2 आणि C3 श्रेणी काय आहे हे जाणून घ्या.

सामान्य प्रवासी कारमध्ये वापरले जाणारे टायर C1 श्रेणीत येतात. C2 श्रेणीमध्ये छोटी वाहने समाविष्ट आहेत जी व्यावसायिक क्रियाकलापांसाठी वापरली जातात. अवजड व्यावसायिक वाहने C3 श्रेणीत येतात जसे ट्रक, बस इ.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानंतर, ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्डच्या दुसऱ्या टप्प्यातील नियम आणि निकष या तीन श्रेणींमध्ये बनवलेल्या टायर्सवर अनिवार्य करण्यात आले आहेत.
टायर्सच्या या तीन श्रेणींचे उत्पादन करताना, ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्ड्सच्या मानदंड आणि मानकांनुसार रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग ध्वनी उत्सर्जन यासारख्या महत्त्वाच्या घटकांवर काम केले जाईल.

आणखी वाचा : Mahindra Scorpio खरेदी करायचीय? पण बजेट नाही, मग तुम्ही ही SUV फक्त ४ लाखात घरी घेऊन जाऊ शकता


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच वाहनांच्या टायर्ससाठी रेटिंग प्रणाली सुरू करणार आहे, ज्यामध्ये रस्त्यावरील नवीन टायर्सचे वजन, रस्त्यावरील पकड आणि ब्रेक लावल्याने टायरमधून येणारा आवाज विचारात घेतला जाईल.

टायर खरेदी करताना ग्राहकांना जागरूक करावे हा हेतू मंत्रालयाच्या टायर रेटिंग प्रणालीमागचा आहे. जेणेकरून ते त्यांच्या वाहनात लावणार असलेले टायर किती सुरक्षित आहेत हे त्यांना कळू शकेल.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministry of road transport and highways notifies new standards regarding tyres design of vehicles read full report prp
First published on: 02-07-2022 at 20:31 IST