मोब-आयन कंपनी भारतासह जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा विचार करत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल सीटर आणि डबल सीटर व्हेरियंटमध्ये येत आहे. मोब-आयन एक फ्रेंच मोबिलिटी स्टार्टअप आहे, जी अलीकडेच चर्चेत आलेली आहे. त्यांनी आता त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर AM1 उघड केली आहे. AM1 ही संपूर्णपणे फ्रान्समध्ये बनवलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक दुचाकींपैकी एक आहे आणि AFNOR मान्यताचा दावा करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर ७० टक्के फ्रान्समध्ये बनलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४० किमीची रेंज

मॉब-आयन इलेक्ट्रिक स्कूटर AMI१ ही ब्रशलेस इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ३ kW ची बॅटरी देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्वॅपिंग बॅटरीचा पर्याय देण्यात आला आहे. जे एका चार्जवर १४० किमीची रेंज देते. नवीन Mob-ion AM1 इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लॉंच करणार आहे. तसेच कंपनीचा दावा आहे की बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी दोन तास तीस मिनिटे लागतात. ही इलेक्ट्रिक स्कूटर ४५kmph च्या टॉप स्पीडवर पोहोचू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mob ion company is bringing electric scooter140km range in single charge scsm
First published on: 24-01-2022 at 13:13 IST