Tips For Riding Two-Wheelers During Monsoon : उन्हाळा असो वा पावसाळा बाईक किंवा स्कूटर चालवताना तुम्हाला त्याच्या टायर्सची खूप काळजी घ्यावी लागते. कारण गाडी चालवताना टायर फुटणे हा एक भयानक अनुभव असतो. तुम्ही अनेकदा असे ऐकले असेल की, टायर फुटल्यामुळे झालेल्या अपघातामुळे चालकाने जीव गमावला. त्यामुळे गाडी चालवताना टायर फुटू नये यासाठी बाईकचे टायर नियतमितपणे तपासणे, त्यात हवा योग्य प्रमाणात ठेवणे, सुरक्षित वेगाने गाडी चालवणे आणि काळजीपूर्वक चालवणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही बाईक किंवा स्कूटर चालवताना लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्यामुळे तुम्हाला टायर फुटण्याची घटनादेखील टाळता येईल.

या कारणांमुळे फुटते बाईकचे टायर

१) खराब झालेले टायर

बाईकच्या टायरच्या लेअर हळूहळू झिजत जातात. जेव्हा टायर खूप खराब होतो तेव्हा त्यात छिद्र किंवा क्रॅक होऊ शकतात, ज्यामुळे हवा बाहेर जाऊ शकते आणि टायर फुटू शकतो. तीक्ष्ण दगड, खड्डे किंवा इतर तीक्ष्ण वस्तूंमुळे टायरला कट जातो किंवा पंक्चर होऊ शकतात. जास्त फुगलेल्या टायर्समध्ये जास्त दाब असतो, ज्यामुळे ते खडबडीत रस्त्याच्या पृष्ठभागासाठी अधिक संवेदनशील बनतात, असे टायर फुटण्याची शक्यता अधिक असते. कालांतराने रबर टायर खराब होतात आणि कमी लवचिक होतात. जुने टायर फुटण्याची शक्यता अधिक असते.

Optical Illusion Test Viral Image
Optical Illusion: तुम्हाला ‘या’ फोटोत ३ सेकंदात काय दिसलं यावरून ओळखा तुमच्याकडे लोक का आकर्षित होतात?
Swelling on Face In Morning
झोपेतून उठताच तुमचा चेहरा सुजलेला दिसतो का? ‘ही’ ६ कारणं वाचून ठेवा, सूज कमी करायची तर आधी हे उपाय कराच
driving tips to avoid accidents
हायवेवरील अपघातांपासून वाचण्यासाठी गाडी चालवताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
If bikers follow these important rules
बाईकचालकांनी ‘या’ महत्त्वाच्या नियमांचे पालन केल्यास बाईक दीर्घकाळ राहील व्यवस्थित
if you speak about 7 things in an interview you will Definitely get job
हमखास मिळेल नोकरी! फक्त मुलाखतीदरम्यान ‘या’ सात गोष्टी न चुकता सांगा
Gut, Stomach Infection Home Remedies
अल्सरचा त्रास, पोटही बिघडतंय? जिरं, ओवा व ‘या’ मसाल्याचा वापर देईल चुटकीसरशी आराम; खाण्याची योग्य पद्धत वाचा
what is sleepwalking and why people walk in sleep
झोपेत चालल्याने इमारतीवरून पडून मुंबईत एकाचा मृत्यू; काय आहे हा आजार? लोक झोपेत का चालतात? तज्ज्ञ काय सांगतात….
Loksatta editorial SEBI issues show case notice to Hindenburg in case of financial malpractice on Adani group
अग्रलेख: नोटिशीचे नक्राश्रू!

२) खराब क्वॉलिटीचा टायर

कधीकधी खराब क्वॉलिटीमुळेही टायर फुटू शकतात. बरेचदा असे दिसून येते की, जेव्हा तुम्ही नवीन टायर घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला तिथे काही टायर हे खराब असल्याचे आढळतात.

३) चुकीच्या मार्गाने वाहन चालवणे

जास्त वेगाने गाडी चालवल्याने टायरवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे ते फुटू शकतात. अचानक आणि जोरात ब्रेक लावल्याने टायरवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळेही ते फुटू शकतात. खड्डे, खराब रस्ते आणि तीक्ष्ण खडक असलेल्या रस्त्यावर वाहन चालवण्यामुळे टायर खराब होऊ शकतात आणि फुटू शकतात. त्याचबरोबर दुचाकी किंवा स्कूटरवर जास्त वजन असल्यास टायरवर जास्त दाब येतो, ज्यामुळे ते फुटू शकतात.

४) चुकीचा हवेचा दाब

कमी फुगलेल्या टायर्समध्ये अधिक लवचिकता असते, ज्यामुळे ते खराब रस्त्यावर वाकतात आणि खराब होतात. त्याचवेळी जास्त फुगलेल्या टायर्समध्ये जास्त प्रेशर असतो, ज्यामुळे ते खराब रस्त्यांच्या पृष्ठभागासाठी अधिक संवेदनशील बनतात आणि ते फुटण्याची शक्यता अधिक असते.

५) टायर फुटू नये म्हणून काय कराल?

तुम्ही बाईक चालवत असाल तर त्याचे टायर नियमित तपासा. टायरमध्ये काही बिघाड, झीज किंवा क्रॅक असल्यास ते बदलून घ्या. याचबरोबर एअर प्रेशर योग्य ठेवा. जास्त वेगाने वाहन चालवणे टाळा. खड्डे, खराब रस्ते आणि तीक्ष्ण खडकाळ रस्त्यावरून वाहन चालवणे टाळा. शक्य असल्यास दुचाकी किंवा स्कूटरवर जास्त वजन टाकू नका. याचबरोबर टायर मॅन्युफॅक्चरर्सने दिलेल्या मुदतीत जुने टायर बदलणे सर्वात महत्त्वाचे आहे.