Monsoon bike riding Tips: सध्या राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत असून साचलेल्या पाण्यामुळे बाईक, कार यांसारखी विविध वाहने पाण्यात अडकली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात बाईक आणि कारच्या मालकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या दिवसात घराबाहेर पडण्यापूर्वी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील टिप्सचे अवश्य पालन करा. पावसाळ्यात बाईकचालकांनी अशी घ्या काळजी (Monsoon bike riding Tips) वॉटरप्रूफिंग पावसाळ्यात वॉटरप्रूफ गियर खरेदी करणं ही चांगली कल्पना आहे, पण हे खूप महाग असू शकते. तुमचे बजेट कमी असल्यास, तुमच्या नियमित राइडिंग गियरवर बसणारे रेन गियर खरेदी करा. तसेच तुमचे रेनवेअर सैल असणेदेखील आवश्यक आहे, जेणेकरून ते बाईकच्या हालचालीत अडथळा आणत नाही. खराब हवामानामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत तुम्ही बाईक चालवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता. वॉटरप्रूफ शूज घाला पावसाळ्यात बाईक चालवताना बऱ्याचदा शूजकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या दिवसांत बाईकवरून प्रवास करताना वॉटरप्रूफ शूज खरेदी करा. देखभाल तुमचा व्हिझर ओला किंवा घाणेरडा असल्यास तो स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ, कोरडे मायक्रोफायबर कापड बरोबर घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. जर तो खराब झाला असेल तर एका कापडाने पुसण्यापूर्वी त्याला पाण्याने साफ करून घ्या. जर तुम्ही तसे केले नाही, तर तुमचा व्हिझर स्क्रॅच होण्याचा धोका आहे. उत्तम नियंत्रण पावसाळ्यात बाईक चालवताना अचानक होणारी कोणतीही कृती टाळा. शक्य तितके थ्रॉटल वेगाने उघडू नका, अचानक जोरात ब्रेक दाबू नका किंवा बाईक वेगाने चालवू नका. या दिवसात बाईक चालवताना नियंत्रण ठेवल्यास कोणताही धोका उद्भवत नाही. स्पीड कमी ठेवा पावसाळ्यातील सुरुवातीचा पाऊस खूप धोकादायक असतो, कारण या पावसात रस्त्याच्या पृष्ठभागावरून तेल आणि घाण बाहेर पडते, ज्यामुळे रस्ता निसरडा होतो. त्यामुळे पावसाळ्यात वेग सामान्यपेक्षा कमी ठेवण्याची शिफारस केली जाते. हेडलाइट्स चालू ठेवा पावसाळ्याच्या दिवसात ढगाळ वातावरण असते, त्यामुळे या दिवसात पाऊस पडत नसला तरीही तुमच्या बाईकचा हेडलाइट चालू ठेवून बाईक चालवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील अंधुकपण कमी होण्यास मदत होते. हेही वाचा: कारमध्ये पावसाचे पाणी गेल्यास काय कराल? ‘या’ टिप्स करा फॉलो अंतर राखा बाईक चालवताना लक्षात ठेवा की, तुमच्यापुढे असलेल्या वाहनांपासून तुम्ही नेहमीपेक्षा जास्त अंतर ठेवा. हे तुम्हाला गती कमी करण्यासाठी अतिरिक्त जागा देते.