टाटा पंच मायक्रो एसयूव्हीला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. किंमत आणि फिचर्स पाहता ग्राहकांचा गाडी खरेदी करण्याकडे कल आहे. टाटा मोटर्सने ऑक्टोबरमध्ये त्यांची टाटा पंच मायक्रो एसयूव्ही लॉन्च केली आहे. कारची सुरुवातीची किंमत ५.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ऑटोकारच्या रिपोर्टनुसार, टाटा पंचच्या काही व्हेरियंटसाठी ९ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे. टाटा पंच Pure, Adventure, Accomlished आणि Creative असा चार प्रकारांमध्ये आहे. सूत्रांनी ऑटोकारला सांगितले की, टाटा पंचच्या प्युअर बेस व्हेरियंटला सर्वाधिक मागणी आहे. या प्रकारासाठी काही शहरांमध्ये ९ महिन्यांहून अधिक प्रतीक्षा कालावधी आहे. त्यानंतर Adventure या व्हेरिएंटलाही सर्वाधिक मागणी आहे. या प्रकारासाठी पाच महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे. रंग आणि ठिकाणानुसार उर्वरित व्हेरिएंटसाठी दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षा सुरू आहे.

टाटा पंचच्या Pure या बेस व्हेरिएंटमध्ये फ्रंट पॉवर विंडो, टिल्ट स्टीयरिंग, ९० डिग्री ओपनिंग डोअर्स, एलईडी इंडिकेटर्स, बॉडी कलर बंपर आणि क्लॅडिंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कंपनीने बेस व्हेरियंटपासूनच सेफ्टी फीचर्सची विशेष काळजी घेतली आहे. यात ड्युअल एअरबॅग्ज, ABS, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, फ्रंट पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञान यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. प्युअर व्हेरियंटमध्ये ग्राहक रिदम पॅक घेऊ शकतात, ज्याची किंमत ३५ हजार रुपये आहे.यात ३.५ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, ४ स्पीकर आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स मिळतील.

कार, दुचाकी चालवत असाल तर सावधान; गेल्या २३ महिन्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना…

टाटा पंच १.२ लीटरचे तीन सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे ८६ बीएचपी आणि ११३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात ५ स्पीड मॅन्युअल (MT) आणि AMT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. कंपनीच्या मते, मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये १८.९७ केएमपीएल ARAI प्रमाणित मायलेज आणि ऑटोमॅटिकमध्ये १८.८२ केएमपीएल उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंटमध्ये फक्त MT पर्याय उपलब्ध आहे, तर AMT ची सुरुवात अॅडव्हेंचर ट्रिमने होते.