2025 Honda Dio Launched: तुमचा बाईक घेण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी नक्की वाचा कारण, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपल्या लोकप्रिय स्कूटर Dio ची नवीन व्हर्जन लाँच केले आहे. यात नवीन १०९.५१ सीसी इंजिन, आयडलिंग स्टॉप सिस्टम, ४.२-इंच टीएफटी डिस्प्ले आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. कंपनीने सांगितले की, ही स्कूटर खास तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन लाँच करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात याची किंमत आणि फिचर्स.

या स्कूटरमध्ये ४.२ इंचाचा टीएफटी डिस्प्ले बसवण्यात आला आहे. या डिस्प्लेवर स्कूटरचा वेग, ट्रिक मीटर, रेंज आणि मायलेज या गोष्टी चालक पाहू शकणार आहे. डिस्प्ले सोबत डियो स्कूटरमध्ये USB टाइप सी चार्जिंग पोर्ट बसवण्यात आला आहे. यामुळे स्कूटर चालवताना चालकाला स्मार्टफोन चार्ज करता येईल.

Google trends : KTM 390 Adventure S
KTM 390 Adventure S की Royal Enfield Himalayan 450 , कोणती बाइक आहे बेस्ट? डिझाइन, फीचर्स, इंजिन अन् किंमत, जाणून घ्या एका क्लिकवर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Convert old car into new upgrade your car by using these tips
वर्षानुवर्षे एकच गाडी वापरून तुम्हाला कंटाळा आला आहे का? मग अगदी स्वस्तात बनवा तुमची कार नवीकोरी, जाणून घ्या ‘या’ टिप्स
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?
navi mumbai municipal administration once again started activities to set up charging stations at 124 places in the city
१२४ ठिकाणी नवी चार्जिंग स्थानके, इलेक्ट्रिक वाहन धोरणासाठी नवी मुंबई महापालिकेचा पुन्हा प्रयत्न
Follow the tips to look like an old car as shiny like a new car
जुनी कार नव्यासारखी चकचकीत दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ

किंमत आणि कलर ऑप्शन

२०२५ ची होंडा डिओ स्कूटर इम्पीरियल रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, पर्ल इग्नियस ब्लॅक + पर्ल डीप ग्राउंड ग्रे, मॅट मार्वल ब्लू आणि मॅट अ‍ॅक्सिस ग्रे मेटॅलिक अशा 5 कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे. किमतींबद्दल बोलायचे झाले तर, नवीन २०२५ होंडा डिओ डिओ एसटीडीच्या बेस व्हेरिएंटची किंमत ७४,९३० रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि डिओ डीएलएक्सची किंमत ८५,६४८ रुपये (एक्स-शोरूम) आहे.

हेही वाचा >> नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा

जबरदस्त इंजिन पॉवर आणि मायलेज

इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, नवीन डिओ स्कूटरमध्ये १०९.५१ सीसी सिंगल-सिलेंडर पीजीएम-फाय इंजिन आहे, हे इंजिन ५.८५ किलोवॅटची पॉवर आणि ९.०३ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यात आयडलिंग स्टॉप सिस्टम देखील आहे, ज्यामुळे स्कूटरचे इंधनही वाचते आणि ही स्कूटर चांगले मायलेजही देते.

Story img Loader