Citroen eC3 India Launch in 2023: फ्रेंच ऑटो कंपनी Citroen आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात आता लवकरच लाँच करणार आहे. ही कार कंपनीच्या सध्याच्या मॉडेल Citroen C3 वर आधारित असणार असून कंपनीच्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे नाव ‘Citroen eC3’ आहे. ही कार इतर कंपन्यांना मोठी टक्कर देणार आहे. कमी किमतीत कंपनी कार उपलब्ध करून देऊ शकते.

Citroen eC3 कार डिझाईन

नवीन इलेक्ट्रिक कार eC3 चे डिझाईन Citroën च्या C3 मॉडेल सारखे आहे. Citroën eC3 ची रचना अंतर्गत ज्वलन इंजिनसह C3 मॉडेलप्रमाणेच केली गेली आहे. या eC3 कारमध्ये Citroën लोगो असलेली स्लीक ग्रिल दिसेल. नवीन इलेक्ट्रिक कारला सेमी-क्रॉसओव्हर डिझाइन देण्यात आले आहे.

iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

Citroen eC3 कार सिंगल चार्जवर ३०० किमी पेक्षा जास्त रेंज देणार

आगामी Citroën eC3 २९.२kWh बॅटरीद्वारे समर्थित आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर ३२० किलोमीटर (ARAI) ची रेंज देईल. बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्रितपणे ५६ bhp पॉवर आणि १४३ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या या इलेक्ट्रिक कारचा कमाल वेग ताशी १०७ किलोमीटर आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने ५७ मिनिटांत बॅटरी १० टक्के ते ८० टक्के चार्ज करता येते, तर १५ अँप सॉकेटच्या मदतीने बॅटरी १० टक्के ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी १० तास ३० मिनिटे लागतात.

(हे ही वाचा : वाहनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! अखेर Mahindra XUV400 SUV ची किंमत आली समोर, आता ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग )

Citroen eC3 कारमधील वैशिष्ट्ये

इंजिनने सुसज्ज असलेल्या Citroën C3 मॉडेलच्या मॅन्युअल एसी प्रकारात जी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, तीच वैशिष्ट्ये नवीन इलेक्ट्रिक कारमध्येही पाहायला मिळतील. Citroen eC3 कारमध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि अनेक डिजिटल उपकरणांसह १०-इंचाची इन्फोटेनमेंट प्रणाली आहे. कंपनीची नवीन इलेक्ट्रिक कार दोन ट्रिममध्ये उपलब्ध केली जाईल.

Citroen eC3 कधी होणार लाँच आणि किंमत किती?

Citroen eC3 ही नवीन कार फेब्रुवारी २०२३ मध्ये देशात लाँच होणार आहे. कंपनीकडून अद्याप किंमतीची माहिती मिळालेली नाही. पुढील महिन्यात लॉन्च होणार्‍या Citroen eC3 कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे ९ लाख रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.