scorecardresearch

New Road Safety Rules: लहान मुलांना दुचाकी प्रवासासाठी नवे नियम; हेल्मेट अनिवार्य, अन्यथा हजार रुपये दंड आणि…

New Road Safety Rules: देशात अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो.खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात घडतात. काही अपघात इतके भीषण असतात की कायमचं अपंगत्व येतं. यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी पावलं उचलताना दिसत आहे.

Bike_Ride
लहान मुलांना दुचाकी प्रवासासाठी नवे नियम; हेल्मेट अनिवार्य, अन्यथा हजार रुपये दंड आणि… (प्रातिनिधीक फोटो)

देशात अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो.खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात घडतात. काही अपघात इतके भीषण असतात की कायमचं अपंगत्व येतं. यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी पावलं उचलताना दिसत आहे. चारचाकी वाहनांमध्ये थ्री पॉइंट बेल्ट आणि सहा एअरबॅग्सचा प्रस्ताव पुढे केल्यानंतर दुचाकीसाठी नवे नियम तयार केले आहेत. चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी नियमावली आखली आहे. नवीन वाहतूक नियमांनुसार दुचाकीस्वारांना मुलांसाठी हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणे अनिवार्य केले आहे, तसेच दुचाकीचा वेग फक्त ४० किमी प्रतितास इतका मर्यादित आहे.

नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. हा नियम चार वर्षांपर्यंतच्या मुलांना लागू असेल. नवीन नियमांनुसार, वापरलेले सुरक्षा हार्नेस हलके, जलरोधक, गादीयुक्त आणि ३० किलो भार वाहून नेण्याची क्षमता असणारे हवे. राइडरने मुलाच्या सुरक्षिततेसाठी हार्नेस घालणे आवश्यक आहे.

Renault Kiger, Nissan Magnite आणि Honda Jazz किती सुरक्षित आहेत? जाणून घ्या ग्लोबल NCAP क्रॅश रेटिंगमधील स्कोअर

दुचाकी वाहनांसाठीच्या नवीन नियमांमध्ये चार वर्षांवरील मुलांनाही क्रॅश हेल्मेट किंवा सायकल हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. हेल्मेट शासनाने ठरवून दिलेल्या मानकांपैकी असायला हवं. मुलांसाठी हेल्मेट बनवण्यास केंद्राने निर्मात्यांना आधीच सूचित केले आहे. दुचाकीस्वारांना मुलांसोबत प्रवास करताना दुचाकीचा वेग ४० किमी प्रतितास पेक्षा जास्त नसावा याची खात्री करणे देखील नियमानुसार बंधनकारक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रालयाने नियमात बदल सुचविणारी एक मसुदा अधिसूचना जारी केली होती. यात रायडर्सना सेफ्टी हार्नेस आणि लहान मुलांसाठी क्रॅश हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव होता.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2022 at 17:26 IST