मारुती सुझुकी भारतातील लोकप्रिय कार उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनी लवकरच मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara) ही एसयुव्ही लवकरच लाँच करणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अधिकृतरित्या लाँच होण्याआधीच या कारचे ५० हजारांहून अधिक बुकिंग झाले आहेत. ११ जुलैला कंपनीकडून या कारसाठीची प्री बुकिंग सुरू करण्यात आली होती. या महिन्यापासुन ही कार विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर तुम्हीदेखील ही कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर या कारमध्ये कोणते आकर्षक फिचर्स आहेत आणि या कारची किंमत काय आहे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : गाडीमध्ये अडकल्यावर बाहेर कसे पडायचे? जाणून घ्या अशावेळी काय करता येईल

मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारचे इंजिन आणि पॉवर

  • मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही भारतातील पहिली अत्यंत मजबूत हायब्रिड कार असणार आहे.
  • या कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात येणार आहेत.
  • या एसयुव्हीमध्ये पहिली e-CVT १.५ लिटर पेट्रोल इंजिन क्षमता हायब्रिड तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे.
  • तर दुसरे इंजिन १.५ लीटर पेट्रोल क्षमतेचे सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे.
  • ट्रान्समिशनसाठी यात ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६ स्पीड एटीचा पर्याय मिळेल.
  • ही कारबाबत १ लिटर पेट्रोलमध्ये २७.९७ किमी मायलेजचा दावा करण्यात आला आहे.
  • ग्रँड विटाराच्या सौम्य-हायब्रीड मॅन्युअल प्रकारात एडब्ल्यूडी (AWD) चा पर्याय देखील उपलब्ध असेल.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारची किंमत
मारुती सुझुकी ग्रंड विटारा या कारची किंमत या महिन्याच्या शेवटी जाहीर केली जाणार असल्याची शक्यता आहे. या कारची किंमत ९.५० लाख ते १८ लाख रुपये या रेंजमध्ये असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटाराची स्पर्धा या कॉम्पॅक्ट एसयूव्हीशी होणार
भारतात लाँच झाल्यानंतर, मारुती सुझुकी ग्रँड विटाराची स्पर्धा ह्युंडाय क्रेटा (Hyundai Creta), स्कोडा कुशाक (skoda kushaq) आणि किया सेल्टोस (Kia Seltos) या गाड्यांशी होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : दिवाळीआधी नवीन गाडी घेण्याचा विचार करताय? मारुती सुझुकीच्या ‘या’ गाडयांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

मारुती सुझुकी ग्रँड विटाराचे व्हेरीयंट
भारतात मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही सिग्मा (SIGMA), डेल्टा (DELTA), झेटा (ZETA), झेटा प्लस (ZETA+), अल्फा (ALPHA) आणि अल्फा + (अल्फा प्लस) या व्हेरीयंटमध्ये उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New suv car maruti suzuki grand vitara receives 50 thousand bookings before lauch know price and features pns
First published on: 13-09-2022 at 16:53 IST