देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्मिती करणारी टीव्हीएस मोटर कंपनीसाठी नोव्हेंबर महिना निराशाजनक ठरला. या महिन्यात विक्रीत घट दिसून आली. नोव्हेंबर २०२१ मध्ये टीव्हीएसची एकूण विक्री १५ टक्क्यांनी घसरून २,७२,६९३ युनिट्स झाली. कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. चेन्नईस्थित टीव्हीएस मोटरने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात ३,२२,७०९ युनिट्सची विक्री केली होती. गेल्या महिन्यात त्याच्या दुचाकी वाहनांची एकूण विक्री २,५७,८६३ युनिट्स होती. नोव्हेंबर २०२० मध्ये ३,११,५१९ युनिट्स होती. अशा प्रकारे त्यात १७ टक्क्यांची घसरण दिसून आली.

कंपनीची देशांतर्गत दुचाकी वाहनांची विक्री नोव्हेंबर २०२१ मध्ये १,७५,९४० युनिट्स होती. गेल्या वर्षी याच महिन्यात २,४७,७८९ युनिट्स होती. अशा प्रकारे त्यात २९ टक्के घट नोंदवली गेली आहे. कंपनीची मोटारसायकल विक्री नोव्हेंबर २०२१ मध्ये १,४०,०९७ युनिट्स होती. एका वर्षापूर्वी याच महिन्यात १,३३,५३१ युनिट्स होती. नोव्हेंबर २०२० मध्ये स्कूटरची विक्री १,०६,१९६ युनिट्सच्या तुलनेत नोव्हेंबर २०२१ मध्ये ७५,०२२ युनिट्स होती.

आता उबेर कॅब व्हॉट्सअ‍ॅपवरून बुक करू शकता; जाणून घ्या

गेल्या महिन्यात, त्याच्या तीनचाकी वाहनांची विक्री ३३ टक्क्यांनी वाढून १४,८३० युनिट्सवर गेली आहे. एका वर्षापूर्वी ११,१९० युनिट्स होती. टीव्हीएस मोटरने सांगितले की, गेल्या महिन्यात निर्यात ३० टक्क्यांनी वाढून ९६,००० युनिट्स झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ७४,०७४ युनिट्स होती. कंपनीची दुचाकी वाहनांची निर्यात नोव्हेंबर २०२१ मध्ये २९ टक्क्यांनी वाढून ८१,९२३ युनिट्सवर गेली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ६३,७३० युनिट्स होती.