scorecardresearch

Traffic Challan: नवा वाहतूक नियम वाचलात का? ‘ही’ चूक केलीत तर भरावा लागेल ४० हजारांचा दंड!

Traffic Challan: तुम्हीही कार, बाईक चालवत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. अन्यथा…

Traffic Challan: नवा वाहतूक नियम वाचलात का? ‘ही’ चूक केलीत तर भरावा लागेल ४० हजारांचा दंड!
जाणून घ्या नवीन वाहतूक नियम (Photo-financialexpress)

New Traffic Rule Came: देशात कितीतरी अपघात रोज होत असतात. त्यामुळे कितीतरी जण गंभीर जखमी किंवा त्यांना आपले प्राण गमवावे लागते. हे अपघात रोखण्यासाठी देशातील वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत. काहीजण त्याचे पालन करतात तर काहीजण त्याचे उल्लंघन करतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते.

वाहतुकीचे नियम पाळणं सर्वासाठीच अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही नियम न पाळल्यास त्याचा भूर्दंड तर बसेलच, पण अनेकदा दुर्घटनांचं प्रमाणही वाढतं. निष्काळजीपणामुळे तुमच्यासोबतच इतर कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला नेहमी जबाबदारीने वाहन चालवण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही वाहतूक नियमांचे पालन केलं नाही आणि तर यापुढे खिसा मोकळा करण्याची तयारी ठेवा. हे टाळण्यासाठी, आपल्याला हे नियम माहित असणे आवश्यक आहे. वास्तविक, राज्य आणि केंद्र सरकारने अनेक कठोर नियम केले आहेत.

(हे ही वाचा : फक्त 1 लाख भरून घरी आणा तुमची आवडती Tata Punch; महिन्याला भरा ‘इतका’ EMI )

वाहतुकीचे नियम मोडल्याने होणार मोठे नुकसान

वाहतूक नियमांचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे जी आपण जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे करत नाही. याचे परिणाम जड दंडाच्या स्वरूपात किंवा जीवितहानीच्या स्वरूपात भरावे लागतात. कधी-कधी तुम्हाला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुरुंगवासही होऊ शकतो. चलनाची रक्कम एवढी असेल की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या घराचे अनेक महिने रेशन चालवू शकाल.

वाहतुकीचे अनेक नियम आहेत. हे सर्व अतिशय विचारपूर्वक केले आहे. समजा तुमच्या वाहनाकडे प्रदूषण प्रमाणपत्र नाही, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही, तुम्ही दारूच्या नशेत आहात, एवढेच नाही तर गाडीचा इन्शुरन्सही फेल झाला आहे आणि तुम्हाला पकडले तर काय होईल? या सर्वांसाठी तुम्हाला दंड आकारला जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही मोठ्या संकटात पडाल.

एकाच वेळी ४० हजार रुपयांपर्यंत दंड

मद्यपान करून वाहन चालवल्यास १५,००० रुपये, कालबाह्य झालेल्या ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन चालवल्यास १०,००० रुपये, प्रदूषण प्रमाणपत्र नसल्याबद्दल १०,००० रुपये आणि विमाशिवाय वाहन चालवल्यास ४,००० रुपये. अशा प्रकारे ३९ हजार रुपयांचे चलन बनवले जाते. वाहतुकीबाबत अनेक नियम आणि कायदे आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. रस्त्यावर सुरक्षित वाहतूक वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी कडक कायदे केले आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 11:08 IST

संबंधित बातम्या