वाहनांमध्ये चुकीचे इंधन भरल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतीलच. असे बर्‍याच लोकांकडून ऐकायला मिळते की, वाहनांमध्ये चुकीचे इंधन भरल्यामुळे नुकसान झाले आहे. आता नुकतीच सोशल मिडीयावर एक घटना व्हायरल होत आहे. या घटनेमुळे सर्व चकीतच झाले आहेत.

नुकतीच ओडिशामधील एक घटना समोर आली आहे. जिथे महिंद्रा XUV700 या SUV मध्ये इंधन टाकीत पेट्रोल ऐवजी डिझेल भरण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बहुतेक हे प्रकरण गैरसंवाद आणि निष्काळजीपणामुळे होते. या कार मालकाने ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. या घटनेनंतर महिंद्राच्या रोडसाइड असिस्टन्सने या कारच्या मालकाला आणि त्याच्या कुटुंबाला कशी मदत केली याबद्दल त्याने सांगितले आहे.

digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…
rishikesh River Rafting Raft stuck in rapid during rafting
ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग दरम्यान अपघात; ९ सेकंदाचा श्वास रोखणारा VIDEO होतोय व्हायरल
elder woman dancing on gulabi sadi viral video
‘गुलाबी साडी अन् लाली लाल लाल’ ट्रेंडवर आजीबाईंनी केला भन्नाट डान्स; पाहा हा व्हायरल Video….
man riding on bull viral video
बापरे! भररस्त्यावर तरुण झाला रेड्यावर स्वार! व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण…

(हे ही वाचा : Yamaha की Jupiter कोणती स्कूटर आहे भारी? येथे जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरचं काही…)

नेमके घडले काय?

हा अनुभव मिश्रा रंजन आर एन यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. मालकाने सांगितले की, तो आणि त्याचे कुटुंब १७ जानेवारी २०२३ रोजी बालासोर येथून प्रवास करत होते. कारमध्ये सात प्रौढ आणि एक लहान मुलगा होता. रात्री ९.३५ च्या सुमारास गाडी भद्रक येथे पोहोचली. भद्रक येथे, मालकाने इंधन भरण्यासाठी कार पेट्रोल पंपवर नेली. ही घटना घडली तेव्हा ते त्यांच्या पोहोचण्याच्या ठिकाणापासून १५० किमी दूर होते. पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याने चुकून त्याच्या एसयूव्हीच्या इंधन टाकीत पेट्रोलऐवजी डिझेल भरले. महिंद्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

महिंद्राच्या संपूर्ण टीमचे मानले आभार

सुदैवाने, मालकाच्या लक्षात आले आणि त्याने कार चालविली नाही आणि नंतर मदतीसाठी सेवा केंद्राशी संपर्क साधला. जेव्हा ते सेवा प्रमुखाशी बोलले तेव्हा त्याने मालकाला RSA किंवा रोडसाइड असिस्टन्ससाठी ऑनलाइन तिकीट काढण्यास सांगितले. त्यांनी तक्रार करताच त्यांना टीमकडून प्रतिसाद मिळाला आणि ९० मिनिटांत त्यांनी या आपत्कालीन परिस्थितीत कार मालकाला मदत केली. टीमने XUV700 च्या मालकाशी संपर्क साधला आणि त्यांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना जे रस्त्यावर अडकले होते त्यांना ड्रॉपची सुविधा दिली. XUV700 चे मालक एकूण प्रतिसादाने खूप खूश झाले आणि त्यांनी या मदतीबद्दल महिंद्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

(हे ही वाचा : Hyundai ची जबरदस्त फीचर्सने भरलेली नवी कोरी कार ८० हजारात खरेदी करा, महिन्याला भरा ‘इतका’ EMI )

तुमच्याही गाडीत चुकीचे इंधन आहे हे कसे ओळखाल ?

गाडीत चुकीचे इंधन भरलेले आहे हे तुम्हाला माहितीच नाही आणि तुम्ही गाडी चालवत असाल तर अशावेळी पॅनिक होऊ नका. त्यावेळी काही सोप्या उपायांनी तुम्ही जाणू शकता की, गाडीत चुकीचे इंधन भरलेले आहे की नाही.

१. पेट्रोलच्या तुलनेत डीजेल जास्त चिकट आणि जड असते. तसेच ते फ्यूअल पाईपला गरम करते. यामुळे गाडीत इंधन असुनसुद्धा ते लवकर चालू होण्यात अडचण निर्माण होते. तसेच  गाडी चालू झाली झाली तरी  इंजिनमधून मोठा आवाज येतो आणि मोठ्या प्रमाणावर धूर येऊन गॅस्केट जळून जाते.

२. जर कोणत्याही प्रकारे गाडीच्या इंजिनपर्यंत डीझेल पोहोचल्यास तेव्हा गाडीतून पांढऱ्या रंगाचे विचित्र धुके निघत असते. डीझेल लवकर जळत नाही आणि त्यामुळे गंज लागण्यासोबत इंजन स्टार्ट होण्यास अडथळा निर्माण होतो. हे या गोष्टीचा संकेत देतात की, गाडीत चुकीचे इंधन आहे.