Second Hand Luxury Cars: देशातल्या अनेक वाहन उत्पादक कंपन्या या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्यांच्या वाहनांवर जबरदस्त डिस्काउंट देत आहेत. डिसेंबर महिन्यात म्हणजेच वर्षाच्या शेवटी वाहनांवर सूट देणे ही कंपन्यांची सामान्य पद्धत आहे. यातच आता प्रीमियम कार निर्माता कंपनी मर्सिडिजच्या (Mercedes-benz) या कारवर अनेक ऑफर आल्या आहेत. जे तुम्हाला आता स्वस्तात घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येकाचं स्वप्न असते की, त्यांच्याकडे मर्सिडीज-बेंझ कार असावी, पण आता हे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. जर तुम्ही जुनी मर्सिडीज-बेंझ कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तुमच्या स्वप्नानातील ही कार तुम्हाला १० लाखांपर्यंत घेता येणार आहे. जाणून कसं…

(आणखी वाचा : फक्त ८० हजारात घरी आणा ‘ही’ लोकप्रिय कार; जाणून घ्या काय आहे फायनान्स प्लॅन…)

मर्सिडीजच्या ‘या’ दोन कार घ्या स्वस्तात

२०१३ मधील जुनी कार ‘मर्सिडीज बेंझ ई क्लास ई 220 सीडीआय एलिगन्स ऑटोमॅटिक’ (Mercedes Benz C Class C 200 AVANTGARDE AUTOMATIC) १०,६८,००० मिळते. ही कार आजपर्यंत ५३५२४ किमी चालली आहे. यात डिझेल इंजिन आहे. ही कार १० वर्षे जुनी आहे.

त्याचप्रमाणे २०१४ मधील जुनी कार Mercedes Benz C Class C 200 AVANTGARDE AUTOMATIC १८,५४,००० रुपयांच्या किंमतीसह उपलब्ध आहे. या कारने आतापर्यंत ८८,३८१ किमी अंतर कापले आहे.त्यात पेट्रोल इंजिन असून त्याचा क्रमांक उत्तर प्रदेशचा आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offers on mercedes benz cars buy secondhand mercedes benz car for just 10 lakhs pdb
First published on: 10-12-2022 at 11:48 IST