Ola Electric Bike: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आपली भक्कम जागा निर्माण केल्यानंतर ओला आता इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. ओला इलेक्ट्रिकने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचा १२ सेकंदांचा व्हिडीओ टीझर रिलीज केला आहे. कंपनी भारतात आपल्या पहिल्या बाईकचे अनावरण १५ ऑगस्टला करणार आहे. ओला कोणत्या प्रकारची मोटरसायकल लाँच करणार आहे हे टीझरवरून स्पष्ट झालेले नाही. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्यानंतर मोठा धमाका झाला होता, आताही तसेच काही बाजारात होऊ शकतं. या टीझरमध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये दोन एलईडी लाईट्स दिसत आहेत. एक मोठा हेडलॅम्प काउलदेखील आहे. तसेच ते विंडस्क्रीनदेखील असू शकते. टीझर व्हिडीओमध्ये कोनीय टँक श्राउड्स असलेली मोटरसायकलदेखील दिसत आहे. या बाईकमध्ये कंपनी कोणते संभाव्य फीचर्स देऊ शकते, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ… या इलेक्ट्रिक मोटरसायकलबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही एक प्रीमियम बाईक असेल अशी अपेक्षा आहे. कंपनी प्रथम पूर्ण लोड केलेले मॉडेल लॉंच करू शकते. बॅटरीची वैशिष्ट्ये आणि श्रेणीबद्दल आतापर्यंत माहिती मिळाली नाही, मात्र अधिक श्रेणीसह स्कूटरच्या तुलनेत याला मोठा बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक तपशील १५ ऑगस्ट रोजी स्पष्ट होईल. काही दिवसांपूर्वीच ओला कंपनीचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून एक संकेत देणारा फोटो शेअर केला होता. या टीझर इमेजमध्ये एक बॅटरी दिसत होती, ज्याबद्दल असा अंदाज लावला जात आहे की, ही बॅटरी व्हायब्रंटच्या आगामी ओला इलेक्ट्रिक मोटरसायकलची असू शकते. काही काळापूर्वी कंपनीने सांगितले होते की, कंपनी डायमंडहेड, रोडस्टर, ॲडव्हेंचर आणि क्रूझर या चार इलेक्ट्रिक बाईक मॉडेल्सवर काम करत आहे. पाहा बाईकची पहिली झलक हेही वाचा >> Godawari Electric Motors : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन ‘इब्लू फिओ एक्स’ केली लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स ओलाने कमी केल्या स्कूटरच्या किमती दरम्यान, टीव्हीएस आणि बजाजमधील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या स्कूटरच्या किमतीतही मोठी कपात केली आहे. आता ओला इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ६९,९९९ रुपये असेल, जी आधी ७९,००० रुपये होती.