scorecardresearch

Premium

Ola ची ऑफर वाचली का? देशातली बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक स्कूटरवर देतेय बंपर सूट; होणार ‘इतक्या’ रुपयांची बचत

ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतेय मोठी सूट, पाहा किती होईल तुमच्या पैशांची बचत…

Ola S1 X+ prices slashed
ओला स्कूटर्सवर मिळतेय मोठी सवलत (Photo-financialexpress)

Electric Scooter Offer: गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांनी (ईव्ही) सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर्सला मागणी वाढत आहे. यातच देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटरवर खरेदीवर मोठी बचत करता येणार आहे.

ओला इलेक्ट्रिकने S1 X+ इलेक्ट्रिक स्कूटरवर २० हजार रुपयांची सवलत जाहीर केली आहे. त्यानंतर या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ८९ हजार ९९९ रुपये झाली आहे. यापूर्वी या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख ०९ हजार ९९९ रुपये होती. ही ऑफर मर्यादित काळासाठी वैध असेल. ही ऑफर कंपनीच्या ‘डिसेंबर टू रिमेंबर’ मोहिमेचा भाग असून ही ऑफर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध आहे.

china, electric vehicle, build your dreams, BYD motors, elon musk, Tesla
चिनी ‘बीवायडी’ मोटर्सने हादरवले ‘टेस्ला’चे साम्राज्य! जगात अव्वल, लवकरच भारतात…
new india assurance recruitment 2024
नोकरीची संधी : न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि. मधील संधी
Ola Launched New Electric Scooter With Large Battery Pack And Eight years Warranty up to 190 KM Range
ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! आठ वर्षांची वॉरंटी अन् १९०Km रेंजचा दावा; जाणून घ्या किंमत
Budget 2024 rooftop solar and electric vehicle charging ecosystem supply and installation of these EV chargers
Budget 2024 : इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन; उत्पादन अन् चार्जिंग स्टेशनमध्ये होणार वाढ

या वर्षअखेरीच्या योजनेव्यतिरिक्त, कंपनी आपल्या ई-स्कूटरसाठी विविध वित्तपुरवठा पर्याय ऑफर करत आहे जसे की निवडक क्रेडिट कार्ड्सवर ५ हजार रुपयांपर्यंत सूट, डाउन पेमेंट, ० प्रक्रिया शुल्क आणि ६.९९ टक्के अत्यंत कमी व्याजदर देत आहे.

(हे ही वाचा : ना बजाज, ना हिरो कोणीच टिकणार नाय? आता होंडाची बाईक देशात नव्या अवतारात दाखल होणार )

Ola S1 चे स्पेसिफिकेशन्स

ओला S1 ही पॉवरट्रेन एका चार्जवर जास्तीत जास्त १५१ किमीची IDC रेंज देते. खरी श्रेणी इको मोडमध्ये सुमारे १२५ किमी आणि सामान्य मोडमध्ये १०० किमी आहे. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर ही इलेक्ट्रिक स्कूटर ३.३ सेकंदात ० ते ४० किमी प्रतितास वेग पकडू शकते. त्याचा टॉप स्पीड ताशी ९० किमी आहे.

Ola S1 ची वैशिष्ट्ये

५००W पोर्टेबल चार्जर वापरून बॅटरी ७.४ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन राइड मोड आहेत. यात ५-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस अनलॉक, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ola electric has announced a flat discount of rs 20000 for s1 x electric scooter pdb

First published on: 05-12-2023 at 11:34 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×