Ola Electric Motorcycle Launch Date: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आपली भक्कम जागा निर्माण केल्यानंतर ओला आता इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. ओला इलेक्ट्रिक आता ग्राहकांसाठी नवीन इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणू शकते. अलीकडे, ओला कंपनीचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून एक संकेत देणारा फोटो शेअर केला आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्यानंतर मोठा धमाका झाला होता, आताही तसेच काही बाजारात होऊ शकतं, या बाईकमध्ये कंपनी कोणते संभाव्य फीचर्स देऊ शकते, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ… या टीझर इमेजमध्ये एक बॅटरी दिसत आहे, ज्याबद्दल असा अंदाज लावला जात आहे की ही बॅटरी व्हायब्रंटच्या आगामी ओला इलेक्ट्रिक मोटरसायकलची असू शकते. काही काळापूर्वी कंपनीने सांगितले होते की कंपनी डायमंडहेड, रोडस्टर, ॲडव्हेंचर आणि क्रूझर या चार इलेक्ट्रिक बाईक मॉडेल्सवर काम करत आहे. २०२४ च्या अखेरीस नवीन बाईक लाँच होऊ शकते टीझर इमेज शेअर करण्यासोबतच भावीश अग्रवालने ‘वर्किंग ऑन समथिंग’ असे कॅप्शनही दिले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, ओलाने आपली पहिली कॉन्सेप्ट बाईक प्रदर्शित केली होती आणि त्यावेळी कंपनीने वचन दिले होते की कंपनी २०२४ च्या अखेरीस नवीन बाईक लाँच करू शकते. सीईओ भाविशने जारी केलेल्या फोटोनुसार यात एक शक्तिशाली बॅटरी पॅक दिसत आहे. ही बॅटरी आकाराने खूप मोठी दिसते. विशेषतः ओला इलेक्ट्रिक बाईकच्या तुलनेत. यासोबतच येथे स्प्रकिट चेनही पाहायला मिळते. अल्ट्राव्हायोलेटची ही इलेक्ट्रिक बाईक दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे ओलाची ही ई बाईकही खूप सुंदर असू शकते. तुम्ही फोटो नीट पाहिल्यास, तुम्हाला देखील दिसेल. या फोटोवरुन बाईक उत्पादनासाठी जवळजवळ तयार आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की कंपनी किमान पुढील महिन्यात १५ ऑगस्ट रोजी नवीन बाईक्सचे अनावरण करू शकते. पाहा ट्विट हेही वाचा >> BMW CE 04: बीएमडब्ल्यू इलेक्ट्रिक स्कूटरचा अखेर भारतात धमाका; किंमत ऐकून अवाक् व्हाल ओला डायमंडहेड: ही आगामी बाईक कंपनीचे फ्लॅगशिप मॉडेल असू शकते ज्यामध्ये डायमंड आकाराचा फ्रंट लुक, लो-स्लंग क्लिप-ऑन, हॉरिजोंटल एलईडी स्ट्रिप आणि हिडन एलईडी हेडलॅम्प पॉड सारखे डिझाइन असेल. ओलाने कमी केल्या स्कूटरच्या किमती दरम्यान, टीव्हीएस आणि बजाजमधील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या स्कूटरच्या किमतीतही मोठी कपात केली आहे. आता ओला इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ६९,९९९ रुपये असेल, जी आधी ७९,००० रुपये होती.