इलेक्ट्रिक बाईकच्या विश्वातील प्रसिद्ध नाव असलेल्या ऑप्टीबाईकने आपली नवी कोरी निर्मिती, ‘आर २२ एव्हरेस्ट’ ही ई-बाईक नुकतीच लाँच केली आहे. बहुतांशवेळा ई- बाईक चार्जिंग केल्यावर बाईक किती वेळ वापरता येईल याविषयी अनेकांना चिंता असते, याच प्रश्नावर ऑप्टीबाईकने थक्क करून सोडणारं उत्तर शोधलं आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक एकदा पूर्णपणे चार्ज केल्यावर तब्बल ३०० मैल म्हणजेच ४८३ किमी प्रवास करू शकते. या बाईकचं आणखी एक महत्त्वाचं फीचर म्हणजे आपल्याला नावावरून अंदाज येऊच शकतो की उंचीवरील ठिकाणी सुद्धा ही बाईक आरामात चालते, कंपनीने सांगितल्याप्रमाणे २४,००० उंचीवर देखील आर २२ एव्हरेस्ट ई बाईक अत्यंत सहज चालवता येऊ शकते.

बाईकला ३,२६०W डबल बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तसेच बाईकला १७०० W इतक्या शक्तीची मोटर आहे. जी २५००W इतकी पीक पॉवर देते.यात Optibike PowerStorm MBB सिस्टम आहे. ज्यामुळे ही इलेक्ट्रिक बाइक ४०% चढणही सहज पार करु शकते. डाऊनहील ड्युअल क्राऊन फॉर्क व एक्सटेंडेड ट्रॅव्हल सस्पेन्शन यामुळे केवळ चढणावरच नाही तर उतारावर सुद्धा बाईक स्थिर राहील याची खबरदारी घेतलेली आहे. या बाइकमध्ये पॉवरच्या पाच लेव्हल आहेत ज्या आपण सोयीनुसार गिअरप्रमाणे बदलू शकता.

Optibike R22 Everest e-bike चे काही फिचर्स

  • Optibike R22 Everest इलेक्ट्रिक बाइक चे वजन ४२ किलोग्रॅम आहे.
  • बाईकला ईलेक्ट्रिक एलसीडी डिस्प्लेसुद्धा आहे.
  • बाइकस्वाराचे वजन जास्तीत जास्त ७३ किलो इतके असावे जेणेकरून प्रति तास २५ किमी या वेगाने ४८३ किलोमीटर अंतर पार करता येईल.
  • बाईकला ३,२६०Wh डबल बॅटरी पॅक असून याचे वजन १६ किलोग्रॅम आहे. हे बॅटरी पॅक रिमूव्हेबल आहेत

ऑप्टीबाईक आर २२ एव्हरेस्ट ही थरार अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक ड्रीम बाईक आहे, मात्र याची किमंत सर्वसामान्यांच्या बजेटपेक्षा अधिक आहे सद्य घडीला ऑप्टीबाईक आर २२ एव्हरेस्ट १८,९०० अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये १४.९६ लाख रुपये इतक्या किमतीला उपलब्ध आहे. कंपनीच्या माहितीनुसार नुसार ही बाईक सध्या मर्यादीत दुकानांमधून खरेदी करता येऊ शकते.