Optibike R22 Everest e bike launched runs 483 km in one charging check features and price | Loksatta

Optibike R22 Everest: एका चार्जिंग मध्ये 483km धावणार, ऑप्टी बाईक आर 22 एव्हरेस्ट चे भन्नाट फीचर व किमंत जाणून घ्या

इलेक्ट्रिक बाईकच्या विश्वातील प्रसिद्ध नाव असलेल्या ऑप्टीबाईकने आपली नवी कोरी निर्मिती, ‘आर २२ एव्हरेस्ट’ ही ई-बाईक नुकतीच लाँच केली आहे.

Optibike R22 Everest: एका चार्जिंग मध्ये 483km धावणार, ऑप्टी बाईक आर 22 एव्हरेस्ट चे भन्नाट फीचर व किमंत जाणून घ्या
ऑप्टीबाईक आर २२ एव्हरेस्ट (फोटो- Opibike)

इलेक्ट्रिक बाईकच्या विश्वातील प्रसिद्ध नाव असलेल्या ऑप्टीबाईकने आपली नवी कोरी निर्मिती, ‘आर २२ एव्हरेस्ट’ ही ई-बाईक नुकतीच लाँच केली आहे. बहुतांशवेळा ई- बाईक चार्जिंग केल्यावर बाईक किती वेळ वापरता येईल याविषयी अनेकांना चिंता असते, याच प्रश्नावर ऑप्टीबाईकने थक्क करून सोडणारं उत्तर शोधलं आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक एकदा पूर्णपणे चार्ज केल्यावर तब्बल ३०० मैल म्हणजेच ४८३ किमी प्रवास करू शकते. या बाईकचं आणखी एक महत्त्वाचं फीचर म्हणजे आपल्याला नावावरून अंदाज येऊच शकतो की उंचीवरील ठिकाणी सुद्धा ही बाईक आरामात चालते, कंपनीने सांगितल्याप्रमाणे २४,००० उंचीवर देखील आर २२ एव्हरेस्ट ई बाईक अत्यंत सहज चालवता येऊ शकते.

बाईकला ३,२६०W डबल बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तसेच बाईकला १७०० W इतक्या शक्तीची मोटर आहे. जी २५००W इतकी पीक पॉवर देते.यात Optibike PowerStorm MBB सिस्टम आहे. ज्यामुळे ही इलेक्ट्रिक बाइक ४०% चढणही सहज पार करु शकते. डाऊनहील ड्युअल क्राऊन फॉर्क व एक्सटेंडेड ट्रॅव्हल सस्पेन्शन यामुळे केवळ चढणावरच नाही तर उतारावर सुद्धा बाईक स्थिर राहील याची खबरदारी घेतलेली आहे. या बाइकमध्ये पॉवरच्या पाच लेव्हल आहेत ज्या आपण सोयीनुसार गिअरप्रमाणे बदलू शकता.

Optibike R22 Everest e-bike चे काही फिचर्स

  • Optibike R22 Everest इलेक्ट्रिक बाइक चे वजन ४२ किलोग्रॅम आहे.
  • बाईकला ईलेक्ट्रिक एलसीडी डिस्प्लेसुद्धा आहे.
  • बाइकस्वाराचे वजन जास्तीत जास्त ७३ किलो इतके असावे जेणेकरून प्रति तास २५ किमी या वेगाने ४८३ किलोमीटर अंतर पार करता येईल.
  • बाईकला ३,२६०Wh डबल बॅटरी पॅक असून याचे वजन १६ किलोग्रॅम आहे. हे बॅटरी पॅक रिमूव्हेबल आहेत

ऑप्टीबाईक आर २२ एव्हरेस्ट ही थरार अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक ड्रीम बाईक आहे, मात्र याची किमंत सर्वसामान्यांच्या बजेटपेक्षा अधिक आहे सद्य घडीला ऑप्टीबाईक आर २२ एव्हरेस्ट १८,९०० अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये १४.९६ लाख रुपये इतक्या किमतीला उपलब्ध आहे. कंपनीच्या माहितीनुसार नुसार ही बाईक सध्या मर्यादीत दुकानांमधून खरेदी करता येऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol-Diesel Price on 2 August 2022: राज्यात आज पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

संबंधित बातम्या

Petrol-Diesel Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठी उलाढाल; पाहा नवे दर
महिंद्राची ‘ही’ कार ठरली जगातील सर्वोत्तम वेगवान इलेक्ट्रिक कार; गाडीने केलाय वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा कशी दिसते ही कार
झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल
Auto Expo 2023: बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतेय Hyundai Creta CNG; मारुतीच्या ग्रँड विटारा, हायरायडरला देणार टक्कर
२०२२ मारुती सुझुकी बलेनो नवीन अवतारात होणार लॉंच! जाणून घ्या हाय-टेक फीचर्सबद्दल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू
पुणे: एकाच दिवशी ३१ हजार नवमतदारांची नोंदणी; ४४२ महाविद्यालयात खास शिबिरे
“पाच कोटी मोजायला गेले होते का?” चंद्रकांत खैरेंच्या आरोपाला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर