भारताचे लोकप्रिय उद्योजक आनंद महिंद्रा ट्विटरवर बरेच सक्रिय असतात. तसेच, त्यांनी केलेल्या ट्विट्समुळे ते सतत चर्चेत देखील असतात. त्यांच्या ट्विटर फीडवर तुम्हाला महिंद्रा कंपनीच्या उत्पादनांपासून, अनेक प्रेरणादायी संदेश, मजेदार व्हिडीओ आणि मिम्स देखील पाहायला मिळतील. पण आज त्यांनी अशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात महिंद्राच्या डीएनएची खासियत सांगितली आहे.

महिंद्रा थारचा एनएफटी जगतात समावेश झाल्यासंबंधीची बातमी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, ‘आमच्या ऑफ रोड गाड्या, ज्या ठिकाणी रस्तेही नाहीत, तसेच, ज्या ठिकाणी अद्याप कोणीही जाऊ शकलेलं नाही, अशा ठिकाणी जाण्यास सक्षम आहेत. हे आमच्या डीएनएमध्ये आहे. म्हणूनच, थारच्या फोटोंनी आम्हाला संग्रहणीय वस्तूंच्या नवीन विश्वात पहिले पाऊल टाकण्यास मदत केली, असे म्हणणे अतिशय उचित ठरेल.’

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…
ग्रामविकासाची कहाणी

बापरे! या स्कुटीवर नक्की कितीजण बसले आहेत? Viral Video पाहून नेटकरीही झाले हैराण

थार एनएफटी म्हणजे काय ? (Thar NFT)

एनएफटी म्हणजे नॉन-फंजीबल टोकन. हे एक प्रकारचे ब्लॉकचेन आधारित उत्पादन किंवा डेटा आहे, जे कलाकार त्यांची कला, संग्रह, संगीत आणि आवाज डिजिटल मालमत्तेत रूपांतरित करण्यासाठी वापरतात. त्याचे चाहते त्यासाठी बोली लावून गुंतवणूक करू शकतात आणि व्यापार करू शकतात. महिंद्रा थार एनएफटीच्या बाबतीत, कंपनीने टेक महिंद्राच्या सहकार्याने आपली पहिली मालिका तयार केली आहे. त्याची बोली २९ मार्चपासून सुरू होणार आहे.

महिंद्रा अँड महिंद्राने थार एनएफटीबद्दल माहिती दिली आहे की, त्याच्या लिलावातून जे पैसे येतील, ते कंपनी आपल्या ‘नन्हीं कली प्रोजेक्ट’साठी वापरणार आहे. हा प्रकल्प देशातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करतो.