पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.

इंधनाचे दर वाढले असल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०१ रुपये ८१ पैसे झाला आहे. याआधी हा दर १०१ रुपये १ पैसे होता. तर दुसरीकडे डिझेलचा दर प्रतिलीटर ९२ रुपये ७ पैशांवर पोहोचला आहे. याआधी हा दर ९३ रुपये ७ पैसे होता.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

मुंबईबद्दल बोलायचं गेल्यास ८० पैशांची वाढ झाल्यानंतर एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी तब्बल ११६ रुपये ७२ पैसे आणि १०० रुपये ९४ पैसे मोजावे लागणार आहेत.

Gold-Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावातील घसरण कायम; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचा दर

इंधर दरवाढ का? : भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के इंधन परदेशातून आयात करतो. करोनाच्या काळात किमती घसरल्यानंतर जगभरात नोव्हेंबर २०२० पासून तेल आणि गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. २२ मार्च रोजी ५० रुपयांच्या वाढीनंतर भारतात १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत नोव्हेंबर २०२० पासून ६० टक्क्यांनी वाढली आहे. जगातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नियंत्रित करण्यात सौदी अरेबियाचा मोठा वाटा आहे. नोव्हेंबर २०२० पासून सौदी अरेबियाच्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी सौदी अरामकोने गॅसची किंमत ३७६ मेट्रिक टनांवरून ७६९ मेट्रिक टनांपर्यंत वाढवली आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ४१ अमेरिकन डॉलरवरून ११५.४ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तेल आणि गॅसच्या किमती फार काळ नियंत्रणात ठेवणे भारतासारख्या देशाला शक्य नाही.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११६.६९९९.४२
अकोला११६.९६९९.७०
अमरावती११७.७३१००.४५
औरंगाबाद११६.८१९९.५३
भंडारा११७.३८१००.१०
बीड११७.५८१००.२८
बुलढाणा११७.१८९९.९२
चंद्रपूर११६.७९९९.५६
धुळे११६.४३९९.१७
गडचिरोली११७.६३१००.३७
गोंदिया११७.८९१००.६०
बृहन्मुंबई११६.७२१००.९४
हिंगोली११८.२२१००.९२
जळगाव११७.६२१००.३४
जालना११८.२११००.८७
कोल्हापूर११७.१९९९.९२
लातूर११७.४९१००.२०
मुंबई शहर११६.७२१००.९४
नागपूर११६.४०९९.१७
नांदेड११९.२३१०१.८८
नंदुरबार११७.५६१००.२६
नाशिक११७.०७९९.७८
उस्मानाबाद११७.६६१००.३६
पालघर११६.७६९९.४५
परभणी११९.७४१०२.३५
पुणे११६.५१९९.२४
रायगड११७.४८१००.१५
रत्नागिरी११७.८४१००.५१
सांगली११६.३४९९.१०
सातारा११७.५५१००.२४
सिंधुदुर्ग११८.३०१००.९९
सोलापूर११६.८२९९.५६
ठाणे११६.७९१००.०१
वर्धा११६.८९९९.६४
वाशिम११७.२४९९.९८
यवतमाळ११७.७४१००.४६