Volkswagen Polo: लोकप्रिय स्पोर्टी हॅचबॅक फॉक्सवॅगन पोलोने भारतात १२ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने कंपनीने पोलो लीजेंड एडिशनची नवीन मर्यादित एडिशन लॉंच केली आहे. त्याला पोलो लीजेंड एडिशन असे नाव देण्यात आले आहे. ही मर्यादित एडिशन केवळ वाहनाच्या GT TSI प्रकारावर आधारित असेल.

हटके लुक

पोलो लीजेंड एडिशनला वेगळा लुक देण्यासाठी फोक्सवॅगनने डिझाइनमध्ये काही बदल केले आहेत. स्पेशल एडिशनला पोलो फेंडर्स आणि बूट बॅजवर “लीजेंड” बॅजिंग मिळते. याला स्पोर्टी लुक देण्यासाठी साइड बॉडी ग्राफिक्स, ब्लॅक ट्रंक गार्निश आणि ब्लॅक रूफ फॉइल देखील मिळेल. कंपनी लीजेंड एडिशनच्या फक्त मर्यादित युनिट्सची विक्री करेल आणि ती १५१ डीलरशिपवर उपलब्ध असेल.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

(हे ही वाचा: लॉंच होताच ‘या’ इलेक्ट्रिक कारला मिळाला जबरदस्त प्रतिसाद; आहे ४६१ किमीची रेंज)

इंजिन

फोक्सवॅगन पोलो लीजेंड एडिशन १.०-लिटर 3-सिलेंडर TSI पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. हे इंजिन ६-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सशी जोडले जाईल. इंजिन ११०PS कमाल पॉवर आणि १७५Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

(Toll Tax Hike: पेट्रोल-डिझेलनंतर जनतेला आणखी एक फटका! आजपासून टोल टॅक्स महागला)

(हे ही वाचा: Jeep Meridian: ७ सीटर एसयूव्हीचे भारतात अनावरण; जाणून घ्या फीचर्स आणि अन्य तपशील)

४ स्टार सेफ्टी रेटिंग

भारतात पोलो हॅचबॅकचे उत्पादन २००९ मध्ये सुरू झाले होते आणि ते २०१० मध्ये लाँच करण्यात आले होते. पुण्यातील चाकण प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित केलेले हे कंपनीचे पहिले मॉडेल होते. आतापर्यंत ही कार भारतातील ३ लाखांहून अधिक कुटुंबांनी घेतली आहे. फॉक्सवॅगन पोलो ही भारतीय बनावटीची पहिली हॅचबॅक होती ज्यांना मानक म्हणून ड्युअल एअरबॅग मिळतात. त्याला २०१४ मध्ये ४ स्टार ग्लोबल NCAP सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.