Pravaig Defy Electric SUV launch date : देशात ई वाहनांची मागणी वाढल्याने विदेशी कार निर्मिती कंपन्यांबरोबरच देशातील वाहन निर्मिती कंपन्या देखील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहने निर्माण करत आहेत. अलिकडेच भारतीय स्टार्टअप कंपनी पीएमव्हीने आपली नवीन पीएमव्ही ईएस ई ही इलेक्ट्रिक कार लाँच केली होती. ही कार छोटी असून तिची रेंजही चांगली आहे. त्यानंतर आता ई वाहन निर्मिती कंपनी प्रवेग आपली Pravaig Defy Electric SUV २५ नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. लाँच पूर्वी कंपनीने या वाहनाचे टिझर रिलीज केले होते. त्यानंतर कंपनीने या वाहनाच्या रंग पर्यांयाबाबत देखील खुलासा केला आहे.

कंपनी ११ रंग पर्यायांसह ही कार ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे. यात बोरडॉक्स, लिथियम, एम्पेरर पर्पल, सियाचिन ब्ल्यू, इंडिगो, मून ग्रे, टर्मरिक येलो, ग्रीन, काझिरंगा ग्रीन, वर्मिलियन रेड, शाईनी ब्लॅक यांचा समावेश आहे. प्रवेग ही कार ब्लॅक रूफटॉप पर्यायासहही उपलब्ध होणार आहे.

UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
rbi 200 currency notes
RBI Alert: १ एप्रिलला २००० च्या नोटा स्वीकारणार नाही, आरबीआयनं केलं जाहीर!
banks will remain open on sunday 31st
रविवारी ३१ मार्चला बँका खुल्या राहणार!

(INNOVA VIDEO: लाँच होण्यापूर्वीच पाहा नवीन इनोव्हा, सनरूफसह दिसते भन्नाट, व्हिडिओतून जाणून घ्या फीचर्स)

इतक्या मिनिटांत होणार ८० टक्के चार्ज

कंपनीने बॅटरी आणि मोटरबाबत खुलासा केलेला नाही. मात्र, कारमधील बॅटरी ३० मिनिटांत ८० टक्के चार्ज होऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. त्याचबरोबर, बॅटरी १० लाख किलोमीटरपर्यंत टिकेल, असा दावा देखील कंपनीने केला आहे. कार ४०२ बीएचपीची शक्ती आणि ६०२ एनएमचा टॉर्क निर्माण करते, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने ही कार ५ स्टार सुरक्षा रेटिंगसह लाँच करण्याची घोषणा देखील केली होती.

स्पीडबाबत बोलायचे झाल्यास, कार एकदा फूल चार्ज झाल्यावर ५०४ किमीची रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. त्याचबरोबर, कार २१० किमी प्रति तासाची सर्वोच्च स्पीड देत असल्याचा दावा देखील कंपनीने केला आहे.