scorecardresearch

प्रिंटेड सोलार पॅनेलच्या मदतीने टेस्लाची कार धावणार १५,००० किमी! ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ प्रयत्नशील

सध्या इलेक्ट्रिक कार खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पर्यावरणपूरक गाड्या म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिलं जात आहे.

australia-tesla
प्रिंटेड सोलार पॅनेलच्या मदतीने टेस्लाची कार धावणार १५,००० किमी! ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ प्रयत्नशील (Reuters)

सध्या इलेक्ट्रिक कार खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पर्यावरणपूरक गाड्या म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिलं जात आहे. तसेच टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्यांबाबत कारप्रेमींमध्ये कुतुहूल कायम आहे. आता प्रिंटेड सोलार पॅनेलच्या मदतीने टेस्लाची गाडी चालवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ प्रिंटेड सोलार पॅनेलची चाचणी घेत आहेत. याचा वापर सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या १५ हजार किमीच्या प्रवासात केला जाणार आहे. प्रिंटेड सोलर पॅनेल हे वजनाने हलके आणि लॅमिनेटेड पीईटी प्लास्टिक आहे. पॅनेलला प्रति चौरस मीटर १० डॉलरपेक्षा कमी खर्च येतो. वाइन लेबल छापण्यासाठी मूळतः वापरल्या जाणार्‍या व्यावसायिक प्रिंटरवर पॅनेल तयार केले जातात.

चार्ज अराउंड ऑस्ट्रेलिया प्रकल्प टीमच्या १८ प्रिंटेड प्लास्टिक सोलर पॅनेलसह टेस्ला इलेक्ट्रिक कारला उर्जा देईल. या माध्यमातून गाडी चार्ज होईल आणि धावेल. पॉल दस्तूर, प्रिंटेड सोलार पॅनेलचे शोधक, म्हणाले की “न्यूकॅसल विद्यापीठाची टीम पॅनेलच्या संभाव्य कामगिरीची चाचणी करेल. कारला उर्जा देण्यासाठी पॅनेल वापरणे लोकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल अधिक विचार करण्यास प्रवृत्त करेल. आम्ही दुर्गम ठिकाणी तसेच अंतराळात तंत्रज्ञान कसे वापरणार आणि कसे चालवू याविषयी माहिती देण्यासाठी ही चाचणी करत आहोत. ८४ दिवसांच्या टेस्ला प्रवासात, संघाने विद्यार्थ्यांना भविष्यात काय असू शकते याची माहिती देण्यासाठी सुमारे ७० शाळांना भेट देण्याची योजना आखली आहे.”

Upcoming Cars: भारतात एसयूव्ही ते इलेक्ट्रिक सेडानपर्यंत ‘या’ गाड्या लाँच होणार, तारीख आणि फिचर्सबाबत जाणून घ्या

टेस्ला कारचे निर्माते आणि टेस्ला इंकचे संस्थापक एलोन मस्क सीएए प्रकल्पाबद्दल काय विचार करतील? असे विचारले असता, दस्तूर म्हणाले की, “आम्हाला आशा आहे की त्यांना आनंद होईल. आमचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान त्याच्या विकासाशी कसे जोडले जात आहे हे दाखवत आहे.”

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Printed solar panels use to power a tesla on a 15000 km journey rmt

ताज्या बातम्या