Raghav Chadha car: आम आदमी पार्टीमध्ये सध्या मोठं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. पक्षाचे उच्च प्रतिष्ठित खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवण्यात आल्याची बातमी समोर आली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तरुण, अभ्यासू व आक्रमक वक्तृत्वासाठी ओळखले जाणारे राघव चढ्ढा हे आम आदमी पार्टीचे महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी अल्पावधीतच राष्ट्रीय राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण, सध्या चर्चेत आहे ती केवळ त्यांची राजकीय घडामोड नाही, तर त्यांच्या साधेपणाची झलक दाखवणारी एक खास गोष्ट.

साधेपणाचं उदाहरण! राघव चढ्ढा यांच्या ताफ्यात कोणती कार?

राजकारणात मोठं नाव असूनही राघव चढ्ढा यांच्याकडे लक्झरी कार्सचा मोठा ताफा नाही आणि ही गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या ताफ्यात मारुतीची एक साधी, पण विश्वासार्ह कार असल्याची माहिती समोर येते.

त्यांच्या कारबद्दल बोलायचं झालं, तर ही गाडी भारतीय बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक मानली जाते. साधेपणा, विश्वासार्हता व किफायतशीर देखभाल यांमुळे ही कार सर्वसामान्यांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे.

फीचर्स ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

ही कार जरी साधी वाटत असली तरी तिच्यात अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत:

७.० इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम
ट्रॅक चेंज, व्हॉल्यूम कंट्रोल, रेडिओ आणि मीडिया सेटअप
Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट
आरामदायी सीटिंग आणि चांगली स्पेस

इंजिनाच्या बाबतीतही ही कार दमदार आहे:

१.२ लिटर K-Series पेट्रोल इंजिन
८९ bhp पॉवर व ११३ Nm टॉर्क
५-स्पीड मॅन्युअल व AMT गिअर बॉक्स पर्याय
तब्बल २३.२६ kmpl मायलेज

या सर्व फीचर्समुळे ही कार किफायतशीर, आरामदायी व विश्वासार्ह ठरते.

मीडिया रिपोर्टस काय सांगतात?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या ताफ्यात २०१९ मॉडेलची कार असून, तिची किंमत सुमारे ९.५ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

इतक्या चर्चेनंतर आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, राघव चढ्ढा नेमकी कोणती कार वापरतात?

तर, या सर्व चर्चेचा शेवट करताना मोठा खुलासा असा की, Maruti Suzuki Swift Dzire हीच ती कार आहे, जी राघव चढ्ढा वापरतात.

साधेपणातून दिला मोठा संदेश

आजच्या काळात अनेक नेते लक्झरी गाड्यांमध्ये फिरताना दिसतात; पण राघव चढ्ढा यांची निवड साधेपणाची आणि जमिनीशी जोडलेली असल्याचं चित्र स्पष्ट करते.

राजकारणात मोठं स्थान मिळालं असलं तरी जीवनशैलीत साधेपणा राखणं – हाच त्यांचा खरा ‘फंडा’ आहे, असं म्हणायला हरकत नाही.