Ratan Tata-Tata Indica: उद्योग क्षेत्रात रतन टाटांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. फक्त उद्योगच नाही तर समाज उपयोगी कामांमध्ये टाट उद्योग समुह नेहमीच अग्रेसर राहिला आहे. टाटा देशात कार विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. टाटा उद्योग समुहाला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या रतन टाटा यांनी नुकतेच त्यांच्या ड्रीम कारसाठी पुन्हा एकदा भावनिक पोस्ट लिहिली आहे. टाटांची ड्रीम कार ‘इंडिका’ २५ वर्षांची झाली आहे. कारला २५ वर्षे पूर्ण झाल्यावर रतन टाटा यांनी त्यांच्या मनातली गोष्ट लिहली.
रतन टाटांची पोस्ट चर्चेत
उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनीही टाटा इंडिका लाँचच्या दिवसांची आठवण करून देणारा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आजच्या २५ वर्षांपूर्वी, टाटा इंडिकाने भारतात स्वदेशी प्रवासी कार उद्योगाला जन्म दिला. टाटा इंडिका १९९८ मध्ये लाँच झाली होती. डिझेल इंजिनवर चालणारी ही पहिली भारतीय हॅचबॅक कार होती. त्याने भारतीयांच्या हृदयात असे स्थान निर्माण केले की, आजही लोक ते लक्षात ठेवतात. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये टाटा इंडिकाला स्थान मिळाले आहे. रतन टाटांनी “जुने दिवस आठवत लिहिलं की, तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेस.”
(हे ही वाचा : Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका! Punch-Harrier केले नवीन अवतारात सादर, १४ ट्रकचाही समावेश, पाहा व्हिडीओ)
पोस्टवर होतोय कौतुकांचा वर्षाव
रतन टाटा यांनी शेअर केलेल्या छायाचित्रात ते टाटा इंडिका कारच्या शेजारी उभे असल्याचे दिसत आहेत. त्यांनी लिहिले, २५ वर्षांपूर्वी, टाटा इंडिका लाँच करणे हे भारताच्या स्वदेशी प्रवासी कार उद्योगाचा जन्म होता. या आनंदाच्या आठवणी आहेत आणि माझ्या हृदयात या आठवणींना विशेष स्थान आहे. पोस्ट शेअर केल्यापासून आतापर्यंत १.३ दशलक्ष पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.
शेअर केल्यानंतर लोकांनी मजेशीर कमेंट्सद्वारे या वाहनाबद्दलचे प्रेम दाखवले आहे. इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले की, हे प्रेम २५ वर्षांपासून अबाधित आहे! दुसर्या वापरकर्त्याने टाटा यांचे ‘दूरदर्शी’ असे वर्णन केले. तर एकाने लिहिले, हा प्रवास २५ वर्षांपासून सुरळीत सुरू आहे. टाटा गुणवत्ता आणि विश्वासाचा समानार्थी शब्द आहे. बहुतेक वापरकर्त्यांनी पोस्टवर त्यांचा आदर व्यक्त केला आहे.
टाटा इंडिका डिझेल आणि पेट्रोल इंजिन पर्यायांसह ऑफर करण्यात आली होती. त्याचे इंजिन १४०५ सीसी चे होते. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येत असे. इंडिका ही ५ सीटर कार होती. त्याची लांबी ३६८५ मिमी, रुंदी १६२५ मिमी आणि व्हीलबेस २४०० मिमी होती.