Tata Nano In 50 Thousand: टाटा नॅनो ही देशातील सर्वात कमी किमतीची पाच सीटर कार आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांची ड्रीम कार टाटा नॅनो सुरुवातीला यशस्वी ठरली होती, पण काळाच्या ओघात या कारच्या विक्रीत घसरण होत राहिली आणि अखेर २०१८ मध्ये कंपनीला या कारचे उत्पादन थांबवावे लागले.

पण तरीही २०१८ पर्यंतच्या मॉडेल्ससह टाटा नॅनो मोठ्या संख्येने बाजारात आहेत. जर तुम्हालाही टाटा नॅनो आवडत असेल किंवा ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येथे जाणून घ्या टाटा नॅनोच्या सेकंड हँड मॉडेल्सवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सची माहिती, ज्यामध्ये तुम्हाला ही कार ५० हजारांच्या बजेटमध्ये मिळेल.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!

Second Hand Tata Nano

सेकंड हैंड टाटा नॅनोची पहिली ऑफर OLX वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे दिल्ली नंबर प्लेट असलेले टाटा नॅनोचे २०१४ चे मॉडेल आहे, ज्याची किंमत ५०,००० रुपये आहे. विक्रेत्याकडून या कारवर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर कोणतीही ऑफर उपलब्ध होणार नाही.

(हे ही वाचा: Old Car selling Tips: जुनी कार विकून चांगली रक्कम मिळवायची आहे? फक्त करा ‘हे’ काम, मिळेल जबरदस्त किंमत )

Used Tata Nano

वापरलेल्या टाटा नॅनोवर आणखी एक उत्तम डील DROOM वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे टाटा नॅनोचे २०१५ चे मॉडेल सूचीबद्ध आहे जे नोएडा, उत्तर प्रदेश येथे नोंदणीकृत आहे. या कारची किंमत ६० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. येथून ही कार खरेदी करताना फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध होईल.

Tata Nano Second Hand

टाटा नॅनो मॉडेलचा आजचा तिसरा सर्वात स्वस्त सौदा QUIKR वेबसाइटवर आढळत आहे. हे आहे टाटा नॅनोचे २०१६ चे मॉडेल, ज्याची किंमत ६५,००० रुपये ठेवण्यात आली आहे. टाटा नॅनोच्या या सेकंड हँड प्रकारावर विक्रेत्याकडून कोणतीही योजना उपलब्ध नाही.

महत्त्वाची सुचना: टाटा नॅनोच्या सेकंड हँड मॉडेल्सवरील या ऑफर्सचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्ही तुमच्या बजेट आणि आवडीनुसार कोणतीही कार खरेदी करू शकता. पण कोणतीही कार ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी तिची खरी स्थिती तपासा, अन्यथा ती खरेदी केल्यानंतर काही कमतरता भासल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.