Renault Sales in india : Renault ही एक फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. मात्र कंपनीसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे रेनॉल्ट कंपनीने ११ वर्षांमध्ये तब्बल ९ लाख गाड्यांची विक्री केली आहे. तसेच विक्री करत असताना कंपनीने विविध प्रॉडक्ट्सच्या पोर्टफोलिओने देशातील ग्राहकांच्या विविध गरजा आणि प्राथमिकता पूर्ण केली आहे.
रेनॉल्ट कंपनीचे देशामध्ये ४५० पेक्षा जास्त विक्री आणि ५३० सर्व्हिस स्टेशन्सचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क कंपनीच्या प्रत्येक ग्राहकाला मदत आणि व्यक्तिगत सर्व्हिस देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.
रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले, ” या उल्लेखनीय कामगिरीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. मागील काही वर्षांमध्ये आम्ही भारतामध्ये एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडियाच्या’ व्हिजनसाठी कंपनीची वचनबद्धता अतूट आहे. रेनॉल्टने आपल्या आगामी उत्पादनांसाठी ९० टक्के स्थानिकीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”
” भारत एक धोरणात्मक देश असून रेनॉल्ट ग्रुपसाठी टॉप ५ बाजारपेठांपैकी एक आहे. भारतासाठी आमच्याकडे एक दीर्घकालीन धोरण देखील आहे. आम्ही भारतासाठी एक मजबूत उत्पादन योजना तयार केली आहे. त्यामध्ये स्थानिकरणावर जास्त जोर देण्यात आला आहे. ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि सेवा यामध्ये काही नवीन कल्पना आणायची रेनॉल्ट ग्रुपची योजना आहे.” असे वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले.
हेही वाचा : दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातल्या महिला बसमधून मोफत प्रवास करू शकणार, सरकारची मोठी घोषणा
रेनॉल्ट इंडियाच्या सध्या असलेल्या उत्पादनांमध्ये २०२१ मध्ये लॉन्च झालेल्या किगर, रेनॉल्ट ट्रायबर, सब-4 मीटर 7-सीटर यांचा समावेश असून त्यामध्ये रेनॉल्ट क्विडचा देखील समावेश आहे जी २०१५ लॉन्च झाली होती. भारतात रेनॉल्ट जास्त प्रसिद्ध झाले तर Duster या गाडीमुळे. जे लवकरच भारतामध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.