scorecardresearch

रेनॉल्टने भारतात ८ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला, Kwid आणि Triber गाड्यांनी दिली मोलाची साथ

गेल्या दशकात रेनॉल्ट इंडियाने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. दहा वर्षात रेनॉल्ट इंडियाने आठ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.

रेनॉल्टने भारतात ८ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला, Kwid आणि Triber गाड्यांनी दिली मोलाची साथ
रेनॉल्टने भारतात ८ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला, Kwid आणि Triber गाड्यांनी दिली मोलाची साथ (Photo- Renault)

गेल्या दशकात रेनॉल्ट इंडियाने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. दहा वर्षात रेनॉल्ट इंडियाने आठ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. याचं श्रेय रेनॉल्टच्या Duster, Kwid आणि Triber या गाड्यांना जातं. या गाड्यांना भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. २०१२ मध्ये भारतात पहिल्यांदा लाँच करण्यात आलेली डस्टर ही लोकप्रिय मॉडेल आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. पण खऱ्या अर्थाने Kwid आणि Triber मुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाला. क्विड गाडी २०१५ मध्ये लाँच करण्यात आली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चार लाख गाड्या विक्री झाल्याचं कंपनीने सांगितलं होतं. तर ट्रायबर ही तीन रो असलेली एमपीव्ही ऑगस्ट २०१९ मध्ये लाँच केली होती. ट्रायबर विक्रीही लाखाच्या घरात झाली आहे. या दोन्ही मॉडेल्समुळे रेनॉल्टला भारतीय बाजारात पाय रोवण्यास मदत केली.

“आम्ही भारतात ८ लाख विक्रीचा टप्पा ओलांडल्याबद्दल खूप आनंदी आहोत. इथपर्यंतचा प्रवास अभूतपूर्व होता. मी आमचे सर्व ग्राहक, डीलर्स, पुरवठादार, कर्मचारी, उत्पादक आणि अभियांत्रिकी संघाचे आभार मानतो. त्यांची मेहनत आणि लोकांच्या विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे.”, असं रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्सचे सीईओ वेंकटराम ममिल्लापल्ले यांनी सांगितलं.

थ्री पॉईंट सीटबेल्ट मधल्या आसनासाठीही अनिवार्य होणार! सूत्रांची माहिती

रेनॉल्टची नविन Kiger सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही गेल्या वर्षी लाँच झाली होती. रेनॉल्टने गेल्या काही वर्षात आपल्या विक्री नेटवर्कमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. कंपनीने गेल्या दोन वर्षात १५० हून अधिक सुविधा जोडून आपले नेटवर्क वाढवलं आहे. सध्या कंपनीचे देशभरात ५३० विक्री आणि ५३० हून अधिक सर्व्हिस स्टेशन आहेत. तसेच २५० हून अधिक वर्कशॉप ऑन व्हील्स आहेत. ग्रामीण बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाने, कार निर्मात्याने VISTAAR नावाची एक विशेष मोहीम सुरू केली जिथे डीलरशिप संघांनी ग्रामीण बाजारपेठेतील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ६५० हून अधिक विशेष विक्री सल्लागारांची नियुक्ती केली असून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच CSC ग्रामीण ईस्टोरसोबत भागीदारी केली आहे CSC eGovernance Services India Limited (CSC-SPV) ची उपकंपनी आहे. याव्यतिरिक्त रेनॉल्ट इंडियाने हिंदी वेबसाइट देखील लॉन्च केली आहे. द्वि-भाषिक वेबसाइट लाँच करणारी पहिली चारचाकी ऑटोमोटिव्ह ब्रँड आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Renault india announced it has crossed eight lakh sales milestone rmt