हॅचबॅक सेगमेंट हा कार क्षेत्राचा एक असा विभाग आहे ज्याची मागणी देशात सर्वाधिक आहे आणि या प्रचंड मागणीचे कारण म्हणजे या हॅचबॅक कार्सचे कमी बजेट आणि उत्तम मायलेज.

हॅचबॅक सेगमेंटमधील सध्याच्या रेंजमध्ये, आम्ही Renault Kwid Climber AMT व्हेरिएंटबद्दल बोलत आहोत जे त्याच्या डिझाइन, किंमत, फिचर्स आणि मायलेजसाठी पसंत केली जाते.

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
a Man falls down from e rickshaw while dance atop vehicle
Video : चालत्या ई – रिक्षाच्या छतावर डान्स करत होता तरुण, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा, व्हायरल व्हिडीओ
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
do you ever eat Wangi Bhaji
Viral Video : वांग्याची भजी कधी खाल्ली का? तरुण चालवतोय वांगी भजीचा स्टॉल, व्हिडीओ होतोय व्हायरल

Renault Kwid Climber AMT व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ५,८३,५०० रुपये आहे जी ऑन रोड असताना ६,४८,९२१ रुपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला ही कार आवडत असेल तर तुम्ही ती खरेदी करण्याचा एक अतिशय सोपा प्लॅन येथे जाणून घेऊ शकता.

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही कार खरेदी केली तर बँक यासाठी ५,८३, ९२१ रुपये कर्ज देईल. या कर्जानंतर तुम्हाला किमान ६५,००० रुपये डाउन पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर दरमहा १२,३४९ रुपये मासिक EMI भरावे लागेल.

या कारवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी, बँकेने ५ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे, ज्यामध्ये बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.

फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट आणि ईएमआयचे संपूर्ण तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्ही या कारचे इंजिन ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊ शकता.

आणखी वाचा : Royal Enfield Classic 350 vs Jawa Perak: किंमत, इंजिन, स्टाइल आणि मायलेजमध्ये कोणती क्रूझर बाईक चांगली? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या

Renault KWID CLIMBER AMT Engine and Transmission: कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीने यामध्ये 999 cc इंजिन दिले आहे जे 67.06 PS ची पॉवर आणि 91 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Renault KWID CLIMBER AMT Mileage: मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही कार २२ किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते.

KWID CLIMBER AMT Features: कारच्या फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीने पॉवर अॅडजस्टेबल एक्सटीरियर रिअर व्ह्यू मिरर, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर विंडो, पॉवर स्टीयरिंग, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी फिचर्स दिली आहेत.