scorecardresearch

Renault Kwid MY22 Climber भारतात लाँच; पाच लाखांपेक्षा कमी किमतीत देणार २२ किमीचं मायलेज

फ्रेंच कार कंपनी रेनॉल्टने आपल्या एंट्री लेव्हल कार Kwid ची नवीन कार लॉन्च केली आहे.

(फाइल फोटो)

फ्रेंच कार कंपनी रेनॉल्टने आपल्या एंट्री लेव्हल कार Kwid ची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे. त्याची सुरुवातीची शोरूम किंमत ४.४९ लाख रुपये आहे. ही कार ०.८ लीटर आणि १ लीटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, Kwid My22 Climber प्रकारांतर्गत ग्राहकांना नवीन रंग निवडता येतील. तसेच हे मॉडेल भारतीय बाजारपेठेच्या सर्व सुरक्षा गरजांची पूर्तता करते. ARAIच्या चाचणीमध्ये Kwid ०.८ लीटर कार एक लिटर पेट्रोलमध्ये २२.२५ किमी धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे.

Renault Kwid पहिल्यांदा कधी लाँच झाली?

Renault Kwid 2015 मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली आणि कंपनीने ४ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली होती. हॅचबॅक कारची लोकप्रियता कायम ठेवण्याच्या प्रयत्नात, रेनॉल्टने Kwid MY22 क्लिंबरचे बेस व्हेरिएंट भारतात ४.४९ लाख रुपयांना लॉन्च केले आहे. याचा अर्थ एंट्री-लेव्हल Kwid RXE ची किंमत आता जुन्या Kwid पेक्षा ५०० रुपये जास्त असेल.

 Renault Kwid MY22 क्लाइंबरसाठी रंगांचे पर्याय –

नवीन क्विड क्लाइंबर पांढर्‍या अॅक्सेंटमध्ये, नवीन ड्युअल-टोन फ्लेक्स व्हीलसह मिळेल. तर ही कार ब्लॅक रूफसह मेटल मस्टर्ड, ब्लॅक रूफसह आइस कूल व्हाइट, मूनलाईट सिल्व्हर आणि झांस्कर ब्लू कलर मध्ये मिळेल.

‘या’ आहेत देशात विकल्या जाणाऱ्या टॉप ५ इलेक्ट्रिक कार

रेनॉल्ट क्विड MY22 क्लाइंबरची वैशिष्ट्ये –

नवीन Kwid मध्ये अँड्रॉइड ऑटो कार प्ले, व्हॉइस रेकग्निशन, सिल्व्हर स्ट्रीक LED DRLs लाईट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि बाहेरील मिरर इलेक्ट्रिकली अॅडजस्ट करता येतील. यासह, नवीन Kwid मध्ये ८-इंचाची टचस्क्रीन, पॉवर विंडो, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS, EBD, AC, रिव्हर्स सेन्सर, सीट बेल्ट आणि स्पीड अलर्ट सिस्टम मिळेल.

‘या’ वाहनांची नोंदणी आठ पटीने महागणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

रेनॉल्ट क्विड MY22 क्लाइंबरचे इंजिन –

 Renault ने Kwid 2022 च्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, ही कार पूर्वीप्रमाणेच दोन पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध असेल. ज्यामध्ये ०.८ लिटर पेट्रोल इंजिन जे 53 bhp पॉवर आणि 72 Nm टॉर्क जनरेट करेल आणि ५ स्पीड गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल. दुसऱ्या पर्यायामध्ये, १ लिटर पेट्रोल इंजिन जे 67 bhp पॉवर आणि 91Nm टॉर्क जनरेट करेल ते 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह देखील उपलब्ध असेल. यासोबतच ग्राहकांना या दोन्ही इंजिनमध्ये Easy-R AMT गिअरबॉक्सचा पर्यायही मिळेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Renault kwid my22 climber launched in india know about price engine specification hrc

ताज्या बातम्या