कमी किमतीच्या हॅचबॅकपासून सेडान आणि एसयूव्हीपर्यंत देशात सर्वाधिक मागणी असलेल्या कार आहेत. लोकांची ही पसंती पाहून कार निर्मात्यांनी कमी बजेटमध्ये चांगल्या डिझाईन आणि फीचर्स असलेल्या कार लॉंच करण्यास सुरुवात केली आहे.

जर तुमचे बजेट ५ लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्हाला आकर्षक डिझाईन आणि उत्कृष्ट फीचर्ससह कार खरेदी करायची असेल, तर या दोन लोकप्रिय कारचे तपशील जाणून घ्या, ज्या त्यांच्या संबंधित विभागातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणल्या जातात.

या कारच्या तुलनेमध्ये, आज आमच्याकडे मारुती एस्प्रेसो आणि रेनॉल्ट क्विड आहेत, ज्यामध्ये तुम्हाला किंमत, मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये या दोघांची संपूर्ण माहिती मिळेल.

Maruti S Presso Price: मारुती एस्प्रेसोची सुरुवातीची किंमत ४.२५ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरियंटवर जाताना ५.९९ लाख रुपयांपर्यंत जाते.

आणखी वाचा : केवळ ७० हजारात खरेदी करा Maruti WagonR, वाचा संपूर्ण ऑफर

Maruti S Presso Engine and Transmission: मारुती एस्प्रेसोमध्ये कंपनीने १ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन ६८ PS पॉवर आणि ९० Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

Maruti S Presso Mileage: मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही एस्प्रेसो २४.१२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Maruti SPresso Features: फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या कारमध्ये Android Auto आणि Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. याशिवाय कीलेस एंट्री, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट, एबीएस, ईबीडी आणि सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

आणखी वाचा : सर्वात स्वस्त Maruti Alto चे CNG व्हेरिएंट फक्त ५७ हजारात खरेदी करा, वाचा ऑफर

Renault Kwid Price: Renault Kwid ची सुरुवातीची किंमत ४.६२ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरियंटवर जाताना ५.९६ लाखांपर्यंत जाते.

Renault Kwid Engine and Transmission: Renault Kwid मध्ये ०.८ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५४ PS पॉवर आणि ७२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

Renault Kwid Mileage: मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही Renault Kwid २२.२५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Renault Kwid Features: Renault Kwid मध्ये, कंपनीने Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, मॅन्युअल एसी, रिव्हर्सिंग पार्किंग कॅमेरा, ABS, EBD सारखी फीचर्स दिली आहेत.