दिग्गज फ्रेंच ऑटो कंपनी रेनॉल्टने आपल्या कॉम्पॅक्ट बहुउद्देशीय वाहन ट्रायबरची मर्यादित आवृत्ती लाँच केली आहे. विक्रीच्या विक्रमाला स्पर्श करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. रेनॉल्टने १८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या बहुउद्देशीय वाहन ट्रायबरने देशात आतापर्यंत १ लाख वाहनांची विक्री केली आहे आणि या यशाच्या निमित्ताने कंपनीने या वाहनाची मर्यादित आवृत्ती लाँच केली आहे. या मर्यादित आवृत्तीची किंमत ७.२४ लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत, दिल्ली) ठेवण्यात आली आहे.

भारत आणि फ्रान्स संघाचा संयुक्त प्रकल्प

रेनॉल्टने सुमारे अडीच वर्षांपूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये ट्रायबर लाँच केले आणि त्याच्या आधारे कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केले. हे बहुउद्देशीय वाहन कंपनीच्या भारत आणि फ्रान्स संघाचा संयुक्त प्रकल्प आहे आणि भारतातील नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या संधी लक्षात घेऊन त्याची खास रचना करण्यात आली आहे.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
GE Aerospace going to Invest Rs 240 Crore in Pune Plant Expansion
विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक

(हे ही वाचा: Yamaha स्कूटरवर बंपर कॅशबॅक ऑफर; जाणून घ्या अधिक तपशील)

ट्रायबर लिमिटेड आवृत्तीचे खास फीचर्स

रेनॉल्टने माहिती दिली आहे की ट्रायबर १- लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल आणि मॅन्युअल आणि इझी-आर ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, स्टीयरिंगमध्येच ऑडिओ आणि फोन कंट्रोल दिलेला आहे ज्यामुळे ड्रायव्हिंग करताना स्टीयरिंग व्हीलवरून हात न काढता ते नियंत्रित केले जाऊ शकतात.

याशिवाय ड्रायव्हर सीट सहा प्रकारे अॅडजस्ट करता येते आणि त्यात रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने, ट्रायबरला ग्लोबल NCAP कडून प्रौढांसाठी चार स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे तर लहान मुलांच्या बाबतीत तीन तारे मिळाले आहेत. क्रॅश टेस्टमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आधारावर हे रेटिंग देण्यात आले आहे.