scorecardresearch

Rishabh Pant Car Collection: ऋषभ पंतच्या ताफ्यात ‘या’ महागड्या कारचा समावेश; पाहा गाड्यांची किंमत आणि खासियत…

ऋषभ पंतच्या ताफ्यात ‘या’ आहेत महागड्या कार.

Rishabh Pant Car Collection: ऋषभ पंतच्या ताफ्यात ‘या’ महागड्या कारचा समावेश; पाहा गाड्यांची किंमत आणि खासियत…
ऋषभ पंत कार कलेक्शन. (Photo-indianexpress)

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा दिल्लीहून रुरकीला जात असताना अपघात झाला. यादरम्यान तो मर्सिडीज बेंझ जीएलसी एसयूव्हीमध्ये बसला होता. हा अपघात इतका भीषण होता की, त्याच्या कारला आग लागली. यावेळी ऋषभही जखमी झाला. ऋषभला नेहमीच कारची आवड आहे आणि त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. ऋषभच्या मालकीच्या कोणत्या खास गाड्या आहेत आज आपण ते पाहूयात.

ऋषभ पंतकडे आहेत ‘या’ आलिशान गाड्या

Ford Mustang

ऋषभला अमेरिकन मसल कार म्हणून प्रसिद्ध फोर्ड मस्टँग आवडते. त्याच्याकडे ही पिवळ्या रंगाची दमदार कार आहे. या कारची किंमत ७४.६१ लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये ऋषभ अनेकवेळा दिल्लीच्या रस्त्यावर स्पॉट झाला आहे.

Audi A8

ऋषभकडे ऑडीची लक्झरी सेडान A8 ही कारही आहे. सेडान तिच्या वैशिष्ट्यांसाठी फार ओळखली जाते. ऋषभचे कुटुंब या कारमधून अनेकदा प्रवास करताना दिसले आहे. कारची किंमत १.१५ कोटी रुपये इतकी आहे. कारमध्ये २९९५ cc चे शक्तिशाली इंजिन असून तिचा टॉप स्पीड २५० किमी आहे.

(हे ही वाचा : Rishabh Pant Car Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऋषभ पंतच्या आईला फोन)

Mercedes-Benz GLC

ऋषभ पंतच्या आवडत्या कारपैकी एक मर्सिडीज बेंझ जीएलसी आहे ज्यामध्ये त्याचा अपघातही झाला होता. तो बहुतांशी ही कार चालवताना दिसतो. या कारची एक्स-शोरूम किंमत जवळपास ७० लाख रुपये आहे. या एसयूव्हीचा टॉप स्पीड सुमारे २२० किमी आहे. प्रति तासापर्यंत जातो. मात्र, ऋषभच्या अपघातानंतर त्याची कार आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.

(हे ही वाचा : “ऋषभ पंतला आईला सरप्राईज द्यायचं होतं, पण…”, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती)

Mercedes-Benz C-Class

लक्झरी कारचा शौकीन असलेल्या ऋषभकडे मर्सिडीज बेंझ सी क्लास सेडान देखील आहे. कार तिच्या या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे ६३ लाख रुपये आहे. कारमध्ये १९९० cc चे शक्तिशाली इंजिन आहे. कारचा टॉप स्पीड २५० किमी आहे. मात्र, या कारमध्ये ऋषभ क्वचितच दिसतो.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 11:08 IST

संबंधित बातम्या