ऑटो क्षेत्रात बरेच बदल घडताना दिसत आहे. सध्या ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. त्यामुळे कंपन्या एक एक करत इलेक्ट्रिक वाहनं बाजारात आणत आहेत. आता नेक्सझू मोबिलिटीनं सायकलप्रेमींसाठी रोडलार्क इलेक्ट्रिक सायकल आणली आहे. ही सायकल पूर्ण चार्ज झाल्यानंतर १०० किमी अंतर कापते असा दावा कंपनीने केला आहे. तर प्रतितास २५ किमीचा वेग आहे. नेक्सझू रोडलार्क इलेक्ट्रिक सायकलमध्ये ५.२ एएच इन-फ्रेम आणि डिटेचेबल ८.७ एएच अशा दोन बॅटरी आहेत. तसेत बीएलडीसी २५० W, ३६ V मोटर आहे. तसेच सायकलमध्ये एबीएससह ड्युअल डिस्क ब्रेक, पेडल असिस्ट मोड देखील आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“रोडलार्क हे ई-सायकल क्षेत्रातील सर्वात मोठं उत्पादन आहे. १०० किमी रेंजसह आणि इतरांच्या तुलनेत आघाडीवर आहोत. यामुळे ई-सायकल वापराला चालना मिळेल. आगामी वर्षात पेट्रोल स्कूटरची जागा घेईल”, असं नेक्सझू मोबिलिटीचे मुख्य मार्केटिंक अधिकारी पंकज तिवारी यांनी सांगितलं.ई-सायकलला चालना देण्यासाठी कंपनीने योजना आखली आहे. यासाठी ब्रँड वितरण कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात यंत आहे. यामुळे पर्यावरणात अनुकूल ई-सायकलची मागणी वाढण्यास मदत होईल. पेट्रोल दुचाकींना चांगला पर्याय उपलब्ध होईल, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

नेक्सझू मोबिलिटीने चेन्नईतील मदुराई, हरयाणातील गुरुग्राम आणि बल्लभगड, कर्नाटकातील विजयपुरा, गुजरातमधील अहमदाबाद, तेलंगाणातील मेडचल मलकाजगिरी आणि छत्तीसगड सारख्या शहरांमध्ये आपलं डीलरशिप नेटवर्क विस्तारलं आहे. तसेच ग्राहक ई-सायकल थेट कंपन्यांच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नेक्सझूवरून खरेदी करू शकतात.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roadlark electric bicycle 100km mileage top speed of 25kmph rmt
First published on: 01-12-2021 at 15:33 IST