भारतीय क्रिकेटपटूंमध्ये अनेकांना लग्झरी गाड्यांची आवड आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश होतो तो म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा. रोहित शर्मालाही गाड्यांची खूप आवड आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा नुकताच त्याच्या लॅम्बोर्गिनी उरूससह विमानतळावर दिसला. या कारची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. विशेष म्हणजे, या कारचा रंग टीम इंडियाच्या टी-शर्टशी जुळणारा निळा आहे. यूट्यूबवर कार्स फॉर यू ने व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे. हे चॅनल वारंवार सेलिब्रिटींना त्यांच्या लक्झरी कारमध्ये पकडते. यावेळी, ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला शोधण्यात यशस्वी झाले. तो उरूसातून बाहेर पडून विमानतळावर प्रवेश करताना दिसत आहे. तो फोटोसाठी पोझ देतो. छायाचित्रे काढल्यानंतर तो विमानतळाच्या आवारात प्रवेश करतो. असे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. (आणखी वाचा : झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल ) Lamborghini Urus 'अशी' आहे खास लॅम्बोर्गिनीची ही जगातील सर्वात वेगवान SUV कार आहे. लॅम्बोर्गिनीच्या या आलिशान कारला स्पोर्ट, Strada (स्ट्रीट), रॅली आणि Corsa (ट्रॅक) असे चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स मिळतात. या कारमध्ये कंपनीने ४.० लीटर ट्विन-टर्बो चार्ज्ड V8 इंजिन दिले आहे, जे ६६६hp पॉवर आणि ८५०Nm टॉर्क जनरेट करते. ही आलिशान कार केवळ ३.३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते. इतकेच नाही तर या कारचा टॉप स्पीड ३०६kmph आहे.