करोना संकट काळात सर्वच उद्योगांना झळ पोहोचल्याचं चित्र आहे. करोना काळात कार निर्मिती क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. मात्र असं असलं तरी ब्रिटेनच्या रोल्स रॉयस मोटर्स कारने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. करोना आणि सेमी कंडक्टरची संकट असूनही लक्झरी स्टेटस असलेल्या रॉल्स रॉयस कंपनीने गेल्या वर्षात गाड्यांची विक्रमी विक्री केली आहे. रोल्स रॉयस मोटर कार्सचे सीईओ मुलर ओटवोस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘२०२१ हे रोल्स-रॉयससाठी अभूतपूर्व वर्ष ठरले. आमच्या ११७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असे घडले. मॉडेलला जागतिक बाजारपेठेत असलेली प्रचंड मागणी लक्षात घेऊन आमच्या ग्राहकांना पसंतीच्या कारचे वेळेवर वितरण केलं.’

जर्मनी लक्झरी कार निर्मात्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अमेरिका (यूएस), आशिया-पॅसिफिक प्रदेश आणि चीनसह जगातील अनेक देशांमध्ये चांगली कामगिरी करून वाहन विक्रीचा हा नवा टप्पा गाठला आहे. काही देशांमध्ये मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कंपनीच्या लक्झरी वाहनांची विक्री जवळपास ५० टक्क्यांनी वाढून ५,५८६ वर पोहोचली आहे.’

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
CSK vs LSG : मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

वाहनांच्या टाकाऊ टायरचं काय होतं तुम्हाला माहिती आहे का?; जाणून घ्या

ऑटो निर्माता कंपनी रोल्स रॉयस आपली पहिली इलेक्ट्रिक कार स्पेक्टर लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. २० व्या शतकाच्या सुरूवातीस स्थापित हा ब्रिटीश ब्रँड १९९८ मध्ये जर्मन ऑटो दिग्गज बीएमडब्ल्यूने विकत घेतला होता.