Rolls Royce लॉन्च करणार जगातील सर्वात महागडी कार; किंमत ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

रोल्स रॉयस कार जवळ असणं प्रतिष्ठेचं समजलं जातं. रोल्स रॉयस कारची बनावट, फिचर्स संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत.

Rolls-Royce-Boat-Tail-rear
Rolls Royce लॉन्च करणार जगातील सर्वात महागडी कार; किंमत ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का (प्रातिनिधीक फोटो)

रोल्स रॉयस कार जवळ असणं प्रतिष्ठेचं समजलं जातं. रोल्स रॉयस कारची बनावट, फिचर्स संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे रोल्स रॉयसबाबत कायम आकर्षण असतं. आता रोल्स रॉयस जगातील सर्वात महाग कार ‘बोट टेल’चं दुसरं युनिट लवकरच लॉन्च करणार आहे. या वर्षातील मे महिन्यात इटलीच्या कोमो झीलच्या किनारी आयोजित करण्यात आलेल्या लक्झरी इव्हेंट कार प्रदर्शनात गाडी सादर केली जाणार आहे. रॉल्स रॉयस जगातील सर्वात महाग अशा बोट टेल गाडीचे फक्त तीन मॉडेल तयार करणार आहे. या गाडीची किंमत जवळपास २०८ कोटी रुपये असणार आहे. रोल्स रॉयसने या गाडीचे पहिले युनिट ऑक्टोबर २०२१ मध्ये सादर केले होते. तर दुसरे युनिट यावर्षी प्रदर्शित केले जाणार आहे.

रोल्स रॉयसने बोट टेल कारच्या दुसऱ्या युनिटबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र ही कार पहिल्या युनिटपेक्षा वेगळी असणार आहे. या कारचे इंटिरियर आणि बॉडीवर्क ग्राहकांनी सांगितल्याप्रमाणे डिझाइन केले आहे. बोट टेलचे दुसरे युनिट १९ फूट लांब आहे. कारमध्ये लाकूडही वापरण्यात येणार आहे.

Car Tips: पहिल्यांदा गाडी खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा नुकसान होऊ शकतं

बोल्ट टेल कारच्या दुसऱ्या युनिटमध्ये दोन टर्बो ६.७ लीटर व्ही-१२ इंजिन असू शकते. इंजिन कलिनन आणि फँटम मॉडेल्समध्ये वापरलं जात आहे. इंजिन ५६३ एचपीपर्यंत पॉवर जनरेट करते. तर ब्लॅक बॅज मॉडेलमध्ये ६०० एचपी पॉवर जनरेट करत आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rolls royce world expensive car launch soon rmt

Next Story
Car Tips: पहिल्यांदा गाडी खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा नुकसान होऊ शकतं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी