scorecardresearch

Royal Enfield: डिसेंबर २०२२ मधील रॉयल एनफिल्डच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप पाच Motorcycles; जाणून घ्या

Royal Enfield : आपण डिसेंबर २०२ मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप ५ मोटारसायकलींबद्दल जाणून घेऊयात.

Top 5 best-selling Royal Enfield motorcycles in December
Royal Enfield- संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Royal Enfield च्या मोटारसायकल या सर्वानाच आवडतात. त्यांचे फीचर्स , डिझाईन , इंजिनची क्षमता आणि त्या गाडीचा लूक यामुळे सरावानेच ती गाडी प्रिय आहे. अलीकडच्या काळामध्ये रॉयल एन्फिल्डला भारतामध्ये आणि जागतिक बाजारपेठांमध्ये चांगले यश मिळाले आहे. Meteor 350 सह पदार्पण केलेल्या नवीन J- मॉडेलसह , इंजिन फीचर्स यामुळे या गाड्या अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. आपण डिसेंबर २०२ मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप ५ मोटारसायकलींबद्दल जाणून घेऊयात.

Royal Enfield Classic 350

Classic 350 हे मॉडेल सर्वात जास्त विकले जाणारे मॉडेल आहे. याचे उत्पादन चेन्नईमधील निर्मात्याने केले आहे. बुलेट सारखेच हे लोकप्रिय झालेले मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये नवीन डिझाईन आणि नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. रॉयल एनफिल्डने क्लासिक ३५० या मॉडेलची डिसेंबर २०२२ मध्ये २०,६८२ युनिट्सची विक्री केली. तर २०२ मध्ये ३४,७२३ वुइंट्सची विक्री केली होती. म्हणजे विक्रीमध्ये ४० टक्क्यांची घट पाहायला मिळाली.

हेही वाचा : भारतात लवकरच लाँच होणार Honda City Facelift कार; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Royal Enfield Hunter 350

रॉयल एनफिल्डच्या नवीन उत्पादन केलेल्यापैकी Hunter 350 हे मॉडेल खरेदीदारांमधील मोठ्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी लाँच करण्यात आले होते. हे मॉडेल डिसेंबर २०२२ मधील सर्वाधिक विक्री होणारे दुसरे मॉडेल आहे. Royal Enfield ने डिसेंबर 2022 मध्ये भारतात हंटर ३५०या मॉडेलच्या १७,२६१ युनिट्सची विक्री केली होती. येत्या काही महिन्यात याची संख्या अजून वाढत जाणार आहे.

Royal Enfield Bullet 350

Bullet 350 हे मॉडल डिसेंबर २०२२ मध्ये सर्वाधिक विकल जाणारे तिसरे मॉडेल आहे. हे एक असे मॉडेल आहे कि, ज्यात अनेक वर्षात अनेक बदल झाले आहेत. किक स्टार्ट किंवा इलेक्ट्रिक स्टार्ट ऐसे फीचर येतात. रॉयल एन्फिल्डने या मॉडेलची डिसेंबर २०२२ मध्ये ८,८१६ युनिट्सची विक्री केली. डिसेंबर २०२१ च्या तुलनेत या विक्रीमध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाले आहे.

Royal Enfield Meteor 350

Royal Enfield Meteor 350 हे रॉयल एनफिल्डचे चौथे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. जे-सिरीज इंजिन आणि प्रीमियम घटकांसह लाँच केलेल्या, रॉयल एनफिल्ड मेटियर ३५० ने शहरासाठी क्रूझर बाइक शोधणाऱ्यांमध्ये त्वरीत प्रसिद्धी मिळवली होती. रॉयल एनफील्डने डिसेंबर २०२२ मध्ये Meteor 350 ची ६,२९८ युनिट्सची विक्री केली होती. २०२१ च्या तुलनेत १०,९७७ युनिट्सची विक्री झाली होती.

हेही वाचा : फक्त १२ हजारांमध्ये घरी घेऊन या Suzuki ची ‘ही’ जबरदस्त स्कुटर; एका लिटरमध्ये धावणार…

Royal Enfield Electra

रॉयल एनफिल्डचे हे सर्वाधिक विकले जाणारे पाचवे मॉडेल आहे. हे असे मॉडेल आहे ते अनेक वर्षे रॉयल एनफिल्ड विकत आहे. आता याचे इंजिन J -सिरीजमध्ये येते. आता हे मॉडेल भारतात बंद करण्यात आले आहे. तरी रॉयल एनफिल्डने डिसेंबर २०२२ मध्ये ३,३८१ युनिट्सची विक्री केली. २१२१ च्या तुलनेने २०२२ च्या विक्रीमध्ये २२ टक्क्यांनी घट झाली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 14:44 IST