scorecardresearch

Premium

Royal Enfield च्या Hunter 350 ची किंमत दुसऱ्यांदा वाढली; खरेदीचा विचार करण्याआधी जाणून घ्या फरक

दरवाढ झाल्यानंतर Hunter 350 या मोटारसायकलच्या किंमतीमध्ये किती फरक पडणार जाणून घ्या..

Royal Enfield Hunter 350
Royal Enfield Hunter 350 (फोटो सौजन्य – financial express)

Royal Enfield कंपनीने भारतामध्ये मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात Hunter 350 ही मोटारसायकल लॉन्च केली होती. या मोटारसायकलला ग्राहकांनी पसंती दर्शवली. त्यामुळे Hunter 350 ची तुफान विक्री होत असल्याचे पाहायला मिळते. मिळणाऱ्या प्रतिसादामुळे कंपनीने या मोटारसायकलची किंमत ३,००० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Royal Enfield कंपनीमधील प्रॉडक्ट रेंजमधील Hunter 350 ही सर्वात कमी वजनांच्या मोटारसायकलपैकी एक आहे. मागणी वाढल्याने किंमत वाढवण्यात आली आहे असे लोक म्हणत आहेत. या लोकप्रिय मोटारसायकलच्या नव्या आणि जुन्या किंमतीविषयीची माहिती आम्ही देणार आहोत.

Royal Enfield Hunter 350 ही रेट्रो आणि मेट्रो या दोन ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध आहे. याचे Retro Hunter Factory Series, Metro Hunter Dapper Series आणि Metro Hunter Rebel Series असे तीन मुख्य प्रकार आहेत. या मोटारसायकलच्या मॉडेल्सची किंमत १.४९ लाख ते १,७५ लाख रुपये इतकी आहे. Hunter 350 मुळे TVS Ronin, Jawa 43, Honda CB350RS या मोटारसायकलसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

Royal Enfield Hunter 350: इंजिन आणि गियरबॉक्स

Hunter 350 मध्ये 349cc, सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड, इंधन-इंजेक्टेड मोटर आहे. ही मोटर 6,100 RPM वर 20.2 bhp आणि 4,000 RPM वर 27 Nm पीक टॉर्क देते. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी मोटारसायकलचे इंजिन जोडलेले आहे. कंपनीने ही मोटारसायकल 36.2 kmpl मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे.

आणखी वाचा – Zen Mobility ने भारतामध्ये लॉन्च केली पहिली Micro Pod EV; 120 km रेंजसह आहेत अनेक अत्याधुनिक फीचर्स, जाणून घ्या सविस्तर..

भविष्यामध्ये भारतात लॉन्च होणाऱ्या Royal Enfield Bikes:

Royal Enfield कंपनी येत्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित मोटारसायकली लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये new-generation Bullet 350 आणि Himalayan 450 यांचा समावेश असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय कंपनी सध्या Himalayan 450, ShotGun 650 आणि GT 650 या मॉडेल्सवर काम करत आहे असे म्हटले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 18:46 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×