royal enfield scram 411 launch date announced know how powerful this bike prp 93 | Royal Enfield Scram 411 लॉन्चिंग डेट जाहीर, जाणून घ्या किती दमदार असेल ही बाईक? | Loksatta

Royal Enfield Scram 411 लॉन्चिंग डेट जाहीर, जाणून घ्या किती दमदार असेल ही बाईक?

Royal Enfield ने आपल्या Scram 411 चा टीझर रिलीज केला आहे. ऑफ-रोडिंग साहसी सहलींची आवड असलेल्या बाइकर्सना टार्गेट करत आहे. अशा बाईकर्ससाठी Scram 411 बाइक अतिशय सोयीची असेल.

Royal-Enfield-Scram-411
(फोटो सोर्स : फाइनेंशियल एक्सप्रेस)

Royal Enfield ने आपल्या Scram 411 चा टीझर रिलीज केला आहे. ही बाईक रॉयल एनफिल्ड हिमालयन सीरीजची बाईक आहे जी १५ मार्चला लॉन्च होणार आहे. रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 411 द्वारे ऑफ-रोडिंग साहसी सहलींची आवड असलेल्या बाइकर्सना टार्गेट करत आहे. अशा बाईकर्ससाठी Scram 411 बाइक अतिशय सोयीची असेल.

Royal Enfield च्या टीझरनुसार, Scram 411 बाईक धुळीने भरलेल्या प्रदेशात राइडसाठी सज्ज आहे. कंपनीने स्क्रॅम 411 बाईकचे वजन खूप हलके ठेवले आहे जेणेकरून, ही बाईक खडबडीत रस्त्यावर सहज चालवता येईल.

Royal Enfield Scram 411 बाईकचे ग्राउंड क्लीयरन्स 200mm आहे आणि तिचे मागील चाक १७ इंच आणि पुढचे चाक १९ इंचाचे आहे, तर Royal Enfield या बाईकमध्ये स्पोक व्हील मिळू शकतं. याशिवाय हिमालयन स्क्रॅम 411 बाइकमध्ये फ्रंट फेंडर, विंडस्क्रीन आणि कनुकल गार्ड देण्यात आले आहेत.

आणखी वाचा : Maruti Dzire CNG लवकरच होणार लॉंच; किंमत, फिचर्स आणि मायलेजपर्यंत संपूर्ण डिटेल्स वाचा

याशिवाय रॉयल एनफिल्डने शहरी युजर्सना लक्षात घेऊन Scrum 411 बाइकला नवीन रंग दिले आहेत. तसेच कंपनी ही बाईक ड्युअल टोन कलरमध्ये लॉन्च करू शकते. ज्यावर तुम्हाला रॉयल एनफील्डच्या जुन्या बाईकसारखे ग्राफिक्स डिझाईन बघायला मिळतात.

Royal Enfield Scream 411 बाइकमध्ये, कंपनी 411cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देऊ शकते जे 6,500rpm वर 24.3bhp पॉवर आणि 4000-4500rpm वर 32Nm टॉर्क जनरेट करेल.

त्याचबरोबर रॉयल एनफिल्डच्या या बाईकला फाईव्ह स्पीड गिअरचा पर्याय मिळेल. यासोबतच जर किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Royal Enfield Scrum 411 बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे २.१० लाख रुपये असू शकते आणि ही बाईक नुकत्याच लॉन्च झालेल्या Yezdi बाईकशी टक्कर देईल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2022 at 20:09 IST
Next Story
टोयोटाची सर्वात स्वस्त कार, न्यू जेनरेशन Toyota Glanza ची प्री-लाँच बुकिंग सुरू!