दुचाकीच्या जगतात रॉयल इनफिल्डला (Royal Enfield) एक वेगळाच दर्जा आहे. त्यामुळे रॉयल इनफिल्ड आपल्या ग्राहकांसाठी आता आपली नुकतीच नवीन बाईक घेऊन आली आहे. रॉयल एनफिल्डने प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपली नवीन क्रूझर बाईक ‘Royal Enfield Super Meteor 650’ आणली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त दोन हजारात करा बुकिंग

Royal Enfield Meteor खरेदी करण्यासाठी कंपनीने आपली बुकिंग विंडो उघडली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आणि त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ते बुक करू शकतात. आता ही बाईक तुम्हाला दोन हजार रुपयांमध्ये बुक करता येणार आहे. या बाईकच्या बुकिंगसाठी कंपनीने २ हजार रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे.

(आणखी वाचा : खुशखबर! ७० हजारांची ‘ही’ स्कूटर फक्त १५ हजारात होईल तुमची; जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर )

Royal Enfield Super Meteor 650 ‘अशी’ आहे खास

Super Meteor 650 ही क्रूझर बाईक म्हणून बाजारात आणली गेली आहे. या बाईकमध्ये वर्तुळाकार आकाराचे एलईडी हेडलॅम्प आणि आरई-अपसाइड-डाउन फ्रंट फॉर्क्स, सिग्नेचर एलईडी टेलटँप, मस्क्यूलर इंधन टाकी, ट्विन एक्झॉस्ट पाईप्स आणि मागील बाजूस फ्रंट-फेसिंग इंडिकेटरही आहेत.

इंजिन म्हणून, नवीन Meteor ला ६४८cc ट्विन-सिलेंडर इंधन-इंजेक्टेड इंजिन दिले जाणार आहे. हे इंजिन ४७PS पॉवर आणि ५२Nm पीक टॉर्क जनरेट करू शकणार आहे. ट्रान्समिशनसाठी, सहा-स्पीड गिअरबॉक्स स्लीपर आणि असिस्ट क्लचसह जोडला आहे. यामध्ये सेमी-डिजिटल, सिंगल-पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ओडोमीटर आणि इंधन निर्देशकही आहे.

सुपर मिटिओर ६५० बाइकच्या फ्रंट व्हीलमध्ये ३२० एमएमचा डिस्क ब्रेक लावण्यात आला आहे तर मागील व्हीलमध्ये ३०० एमएमचा डिस्क ब्रेक लावण्यात आला आहे. या ब्रेकिंग प्रणालीसोबत ड्युअर चॅनल एबीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. बाईकच्या पुढील भागात ४३ एमएम अप साइड डाऊन फोक्स सस्पेन्शन सिस्टम आणि मागे ट्विन गॅस चार्ज शॉक अब्झॉर्बर सस्पेन्श देण्यात आले आहेत. 

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield super meteor 650 cruiser bike can be booked for just 2 thousand pdb
First published on: 04-12-2022 at 12:55 IST