scorecardresearch

तरुणांना वेड लावणाऱ्या Royal Enfield च्या सुपरबाईकची किंमत आली समोर, झटपट करा बुकींग

Royal Enfield: गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या बाइकप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. Royal Enfield च्या ‘या’ सुपरबाईकची आजपासून भारतात बुकिंग सुरू झाली आहे.

तरुणांना वेड लावणाऱ्या Royal Enfield च्या सुपरबाईकची किंमत आली समोर, झटपट करा बुकींग
Royal Enfield Super Meteor 650 ची बुकिंग भारतात सुरू (Photo-financial express)

Royal Enfield Super Meteor 650: रॉयल इन्फिल्ड (Royal Enfield) च्या बाईक्स देशात प्रचंड लोकप्रिय आहेत. देश भ्रमंती करणारे बाईक रायडर्स रॉयल इन्फिल्डच्या बाईक्सना प्रचंड पसंती देतात. दुचाकीच्या जगतात रॉयल इनफिल्डला एक वेगळाच दर्जा आहे. दिग्गज वाहन निर्माती कंपनी रॉयल एनफील्डने Royal Enfield Super Meteor 650 बाईक लाँच केली आहे. नवीन Royal Enfield Super Meteor 650 च्या आज १६ जानेवारी २०२३ रोजी अधिकृतपणे किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.

Royal Enfield Super Meteor 650 चे ‘असे’ आहे डिझाईन

रॉयल इन्फिल्ड सुपर मेटिओर ६५० मध्ये टिअरड्रॉप आकाराचे फ्युअल टँक, गोलाकार एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प, रुंद हँडलबार, स्प्लिट टाइप सीट, ड्युअल एक्झॉस्टसह पुढच्या दिशेने पाय राहातील अशी बसण्याची व्यवस्था असेल. बाईकमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि मल्टी स्पोक अलॉय व्हिल्स असतील.

(हे ही वाचा: 50 हजारांपेक्षा कमी किंमतीतील ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळेल मोठ्या रेंजची हमी )

Royal Enfield Super Meteor 650 चे इंजिन

बाईकमध्ये ६४८ सीसी पॅरेलल ट्विन इंजिन असेल. हे इंजिन ४७.५ बीएचपीची शक्ती आणि ५२ एनएमचा टॉर्क निर्माण करण्याची शक्यता आहे. बाईकला स्लिपर क्लचसह सिक्स स्पिड गेअरबॉक्स मिळेल.

Royal Enfield Super Meteor 650 किंमत

रॉयल एनफील्ड, या प्रतिष्ठित मोटरसायकल ब्रँडने घोषणा केली आहे की, त्यांची नवीन Royal Enfield Super Meteor 650 क्रूझर आता भारतात बुकिंगसाठी खुली आहे. बहुप्रतीक्षित मोटारसायकलची किंमत सुमारे रु. ३ लाख (एक्स-शोरूम) आणि पुढील महिन्यापासून देशभरातील शोरूममध्ये उपलब्ध होईल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 17:59 IST

संबंधित बातम्या