टू व्हीलर अ‍ॅडव्हेंचर बाईक सेगमेंटमध्ये, देशातील आघाडीची मोटरसायकल उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्ड आपल्या हिमालयन अ‍ॅडव्हेंचर बाईकची हलकी आवृत्ती लवकरच लॉंच करणार आहे. कंपनी ही रॉयल एनफिल्ड हिमालयन ४५० सीसी इंजिनसह बाजारपेठेत उतरवणार असून २०२३च्या पहिल्या तिमाहीत ही बाईक लॉंच होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, ही नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन ४५० लूक आणि डिझाइनमध्ये सध्याच्या हिमालयनसारखेच असेल परंतु इंजिनच्या बाबतीत ते अधिक इंधन कार्यक्षम असल्याचे सिद्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या बाइकमध्ये सिंगल सिलेंडर ४५० सीसी इंजिन देणार आहे जे लिक्विड कुल्ड तंत्रज्ञानावर आधारित असेल. हे इंजिन ४० बीएचपी पॉवर जनरेट करेल तसेच यासोबत ५ स्पीड गिअरबॉक्स दिला जाईल. पण कंपनीने या बाईकच्या पीक टॉर्कबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

रॉयल एनफिल्ड हिमालय ४५० ‘हे’ असतील नवीन फीचर्स

सध्याच्या रॉयल एनफिल्ड हिमालयन बाइकमध्ये सिंगल सिलेंडर ४११ सीसी इंजिन देण्यात आले असून ते लिक्विड कुल्ड फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन २४.३ बीएचपी पॉवर आणि ३२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर यात ५ स्पीड गिअरबॉक्ससोबत देण्यात आले आहे. नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन ४५०चे डिझाईन सध्याच्या हिमालयनपेक्षा खूपच हलके बनवण्यात येणार आहे. जेणेकरून रायडरला अधिक आरामदायी रायडिंगचा अनुभव मिळेल.

हेही वाचा : टाटा मोटर्सची पहिली CNG कार १९ जानेवारीला होणार लॉंच, फक्त पाच हजारामध्ये करा बुकिंग

या बाईकचे वजन कमी करण्यासाठी कंपनी ट्रेन फ्रेम वापरणार असल्याने ही बाईट सध्याच्या बाईकपेक्षा खूपच हलकी असेल. कंपनी या नव्या बाईकच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन देऊ शकते. याचसोबत ड्युअल चॅनेल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमही दिली जाण्याची शक्यता आहे. बाईकच्या समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्सऐवजी युएसडी फॉर्क्स देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. तज्ञांच्या मते, २.५० ते २.७० लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीसह कंपनी ही बाईक लॉंच करू शकते.

देशांतर्गत बाजारपेठेत लॉंच केल्यानंतर, ही बाईट या सेगमेंटमधील दोन लोकप्रिय बाईक्स केटीएम ३९० अ‍ॅडव्हेंचर आणि बीएमडब्ल्यू जी ३१० जीएस यांना टक्कर देईल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield will soon launch himalayan 450 ready to compete with ktm 390 and bmw g310gs pvp
First published on: 10-01-2022 at 17:59 IST