Premium

सचिन तेंडुलकरने IPL संपताच खरेदी केली महागडी वस्तू; ‘ही’ गोष्ट अजून अंबानींकडेही नाही, पहा किंमत व फीचर्स

Sachin Tendulkar News: आयपीएल २०२३ ची सांगता होताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वतःला एक खास गिफ्ट दिले आहे.

Sachin Tendulkar buys Lamborghini Urus S Supercar Worth More Than 4 Crores As IPL 2023 Ends Mukesh Ambani does not have it
सचिन तेंडुलकरने IPL संपताच खरेदी केली महागडी वस्तू (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sachin Tendulkar Lamborghini Urus S: आयपीएल २०२३ ची सांगता होताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वतःला एक खास गिफ्ट दिले आहे. सचिनचे गाड्यांवरील प्रेम आपणही जाणून असाल त्यामुळे त्याने आपले कार कलेक्शन सुद्धा तितकेच भन्नाट बनवले आहे. आता या तेंडुलकर कुटुंबातील गाड्यांच्या ताफ्यात तब्ब्ल ४ कोटीहून अधिक किमतीची लॅम्बोर्गिनी जोडली गेली आहे. सचिन तेंडुलकरने स्वतःला लॅम्बोर्गिनी उरुस एस. ची गिफ्ट दिली आहे. याची खासियत म्हणजे या गाडीचा रंग टीम इंडियाच्या व मुंबई इंडियन्सच्या मूळ जर्सीच्या रंगाचा म्हणजेच निळा आहे. Lamborghini Urus S सुपरकारची किंमत ४.१८ कोटी रुपये आहे. ही गाडी भारतातील सध्याची सर्वात लेटेस्ट कार असून अद्याप मुकेश अंबानींनी सुद्धा या गाडीची खरेदी केलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन तेंडुलकरच्या नव्या Lamborghini Urus S चे फीचर्स

नवीन Lamborghini Urus S ही मूळ Urus Super SUV चे अपडेटेड व्हर्जन आहे. सचिन तेंडुलकरच्या या सुपरकारमध्ये ३.५ सेकंदात ०-१०० किमी/ताशी आणि १२.५ सेकंदात ०- २००किमी/ताशी धावण्याची क्षमता आहे. ३०५ किमी/तास या सर्वोच्च गतीसह ही सुपरकार धावू शकते. तसेच ब्रेक लावताच Urus S 100 किमी/ताशी वरून फक्त 33.7m मध्ये शून्यावर येऊ शकते. त्याचे ट्विन-टर्बो इंजिन २,३०० rpm वर कमाल ६००० rpm पर्यंत ८५० Nm कमाल टॉर्क जनरेट करते.

हे ही वाचा<< फक्त २ रुपयात अंबानींचे घर तुम्हालाही आतून पाहता येणार; कसं ते जाणून घ्या

सचिन तेंडुलकरकडे उच्च श्रेणीतील अनेक कार आहेत, परंतु ही त्याची पहिली लॅम्बोर्गिनी आहे. ‘क्रिकेटचा देव’ मुंबईत अनेक वेळा पोर्श 911 टर्बो एस, पोर्श केयेन टर्बो, बीएमडब्ल्यू i8 सारख्या त्याच्या लक्झरी स्पोर्ट्स कारमध्ये फिरताना दिसला आहे. आता या नवीन कारमध्ये सचिनचा डॅशिंग लुक कधी पाहायला मिळणार हे पाहण्याची उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar buys lamborghini urus s supercar worth more than 4 crores as ipl 2023 ends mukesh ambani does not have it svs