scorecardresearch

कारमध्ये असणारे ‘हे’ सेफ्टी फीचर तुम्हाला माहित आहेत का? संकटात ठरतील उपयुक्त, लगेच जाणून घ्या

कारमध्ये असणारे महत्त्वाचे सेफ्टी फीचर जाणून घ्या

कारमध्ये असणारे ‘हे’ सेफ्टी फीचर तुम्हाला माहित आहेत का? संकटात ठरतील उपयुक्त, लगेच जाणून घ्या
कारमध्ये असणारे सेफ्टी फीचर (Photo: Freepik)

प्रत्येक दिवशी अपघाताच्या अनेक बातम्या आपण ऐकतो, पाहतो. अनेकवेळा अशा अपघातात त्या गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना जीव गमवावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेल्या गाडयांमध्ये अनेक सेफ्टी फीचर उपलब्ध असतात. पण त्याबाबत अनेकांना माहिती नसते. या सेफ्टी फीचरची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक असते, ज्याची संकटाच्या काळात मदत होऊ शकते. कोणत्या सेफ्टी फीचर्स बद्दल सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे जाणून घ्या.

कारमधील सेफ्टी फीचर्स:

ऍडॉप्टीव्ह क्रूज कंट्रोल
ऍडॉप्टीव्ह क्रूज कंट्रोल या फीचरचा वापर करून गाडी स्वतःचा वेग समोरच्या गाडीच्या वेगानुसार कमी करते. क्रूज कंट्रोलप्रमाणे रडार सेन्सर देखील वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवते. समोर चालणाऱ्या गाडी वेग जास्त असेल तर या यंत्रणेद्वारे गाडीला सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात.

नाईट व्हिजन
रात्रीच्या प्रवासात बऱ्याचदा समोरच्या गोष्टीं स्पष्ट न दिसल्यामुळे अपघात होतात. त्यासाठी अनेक गाड्यांमध्ये नाईट व्हिजन फीचर उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे आपल्या डोळ्यांना अंधारामुळे स्पष्ट न दिसणाऱ्या गोष्टी पाहण्यास मदत मिळते. हे फीचर वापरण्यासाठी एक थर्मोग्रफिक कॅमेरा गाडीत बसवण्यात येतो, ज्याचा वापर करून कारमधील इन्फोटेनमेंट स्क्रिनवर माहिती दिली जाते.

सेफ एग्जीट असिस्ट
इलेक्ट्रॉनिक चाईल्ड सेफ्टी लॉकमुळे गाडी सुरू असताना मागे बसलेल्या लहान मुलांना दरवाजे उघडता येत नाहीत. पण गाडी थांबल्यानंतर हे लॉक उघडले जातात . ज्यामुळे मुलं गाडी थांबल्यानंतर दरवाजे उघडू शकतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी सेफ एग्जीट असिस्ट फीचर मदत करते. या फीचरमुळे बाजुने वेगाने जाणाऱ्या वाहनांचा रडारद्वारे अंदाज घेतला जातो आणि वाहन चालकाला याबाबत सुचना दिल्या जातात.

ड्रायवर फटीग असिस्ट
या फीचरचा वापर करुन ड्रायवरला सतत गाडी चालवण्याने येणाऱ्या थकव्याबाबत इशारा देण्यात येतो. हे फीचर नेव्हीगेशनशी जोडल्यानंतर रस्त्यात येणाऱ्या कॉफी शॉप, रेस्ट रूम याबाबत ही माहिती दिली जाते.

३६० डिग्री कॅमेरा
३६० डिग्री कॅमेरा फीचरमुळे गाडीतील इन्फोटेनमेंट स्क्रिनवर गाडीच्या आजुबाजूला असणाऱ्या तसर्व गोष्टींबाबत चालकाला माहिती मिळते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी फायदा मिळतो.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 20:23 IST

संबंधित बातम्या