बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सातत्याने लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे अभिनेत्याला वाय प्लस सुरक्षादेखील प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान, सलमानने आता त्याच्या सुरक्षेसाठी एक महागडी बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. सलमानने बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही परदेशातून आयात केली आहे. ही एक हाय एंड बुलेट-प्रूफ एसयूव्ही कार आहे. ही कार अद्याप भारतात लाँच करण्यात आलेली नाही. सलमान नुकताच कारमधून फिरताना दिसला आहे.

या कारमध्ये B6 किंवा B7 लेव्हलपर्यंतची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ही कार जागतिक स्तरावरील सुरक्षित कार्सपैकी एक आहे. बी ६ लेव्हलपर्यंतची सुरक्षा प्रदान करणाऱ्या कार्स रायफलद्वारे झाडलेल्या गोळ्यांचादेखील सामना करू शकतात. या कारने आता सलमान खानच्या टोयोटा लँड क्रूझर एलसी २०० या कारची जागा घेतली आहे. या कारमध्ये सलमानने बुलेटप्रूफ काच लावून घेतली होती.

two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष

कारची किंमत किती?

या कारच्या किंमतीबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही, कारण ही कार आपल्या देशात उपलब्ध नाही. परदेशातल्या या कारच्या रेग्युलर मॉडेलची किंमत ८० लाख रुपये ते १ कोटी रुपये आहे. परंतु सलमानने या कारची सुरक्षा वाढवली आहे. यात बुलेटप्रूफ फीचर्स दिले आहेत. तसेच ही कार परदेशातून आयात केली असल्यामुळे या कारसाठी २ ते ३ कोटी रुपये मोजले असतील, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Mahindra अन् Hyundai चा ग्राहकांना झटका! ‘या’ लोकप्रिय कारच्या वाढवल्या किमती, पाहा नवीन दरवाढ

सलमान खानला आधी धमकी देणारं पत्र मिळालं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी सलमान खानच्या व्यवस्थापकाला धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. त्यात हिंदी भाषेत म्हटलं होतं की, “गोल्डी भाई मामले को बंद करने के लिए सलमान खान से आमने-सामने बात करना चाहते हैं, अगली बार, झटका देखने को मिलेगा।”